गणेशोत्सव निमित्त मुर्ती विसर्जन व संकलन केंद्राचे आयोजन, नगरसेवक संदीप वाघेरे यांचा स्तुत्य उपक्रम

केंद्रामध्ये गणरायाची आरती करण्यासाठी 25 X 60 आकाराचा मंडप उभारण्यात आला आहे. तसेच 6  मीटर लांबीचे शुद्ध पाण्याचे दोन हौद तयार करण्यात आलेले आहेत. तसेच लोकभावनेचा आदर करित केंद्रामध्ये संकलित व विसर्जित करण्यात आलेल्या गणेशमुर्ती हिंजवडी येथे महापालिकेने ठरवुन दिलेल्या खाणीमध्ये वाहतुक करुन विसर्जित केल्या जाणार आहेत.

    पिंपरी – लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने पिंपरी येथे मुर्ती विसर्जन व संकलन केंद्राचे आयोजन करण्यात आले आहे.

    याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सर्व घाटावर मुर्ती विसर्जन करण्यास मनाई करण्यात आली. परंतु नागरिकाच्या भावनेचा विचार करत पिंपरी परिसरातील सर्वांसाठी मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी जनसंपर्क कार्यालयसमोरील जागेमध्ये गणेश मुर्ती विसर्जन व संकलन केंद्राचे आयोजन करण्यात आले आहे.

    सदर केंद्रामध्ये गणरायाची आरती करण्यासाठी 25 X 60 आकाराचा मंडप उभारण्यात आला आहे. तसेच 6  मीटर लांबीचे शुद्ध पाण्याचे दोन हौद तयार करण्यात आलेले आहेत. तसेच लोकभावनेचा आदर करित केंद्रामध्ये संकलित व विसर्जित करण्यात आलेल्या गणेशमुर्ती हिंजवडी येथे महापालिकेने ठरवुन दिलेल्या खाणीमध्ये वाहतुक करुन विसर्जित केल्या जाणार आहेत. आतापर्यंत जवळपास 700 च्या वर या योजनेचा लाभ नागरिकांनी घेतला असून पिंपरीगाव व परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. शनिवार दिनांक 18 व अनंत चतुर्दशी च्या दिवशी सकाळी 8 ते राञी 10 वाजेपर्यंत नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे. तसेच विसर्जन केंद्रांवर येताना नागरिकांनी सर्व शासकीय नियमांचे पालन करावे असे आवाहन देखिल संदीप वाघेरे यांनी केले आहे.