कौठडी येथे भरली डाळींब पिकाची शेती शाळा

कुरकुंभ :महाराष्ट्र शासन कृषि विभाग व कृषि विज्ञान केंद्र बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने कौठडी.( ता.दौंड ) येथे तालुका कृषि अधिकारी दौंड यांचे मार्फत डाळिंब पीकाची शेतीशाळा आयोजित करण्यात आली होती. डाळिंब पिकावरील कीड व रोग सल्ला प्रकल्पाच्या माध्यमातून या शेतीशाळेत डाळींब पिकाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे विषय विशेषज्ञ, डॉ मिलिंद जोशी,हे उपस्थित होते, याप्रसंगी मिलिंद जोशी यांनी मार्गदर्शन करताना डाळिंब पिकावरील कीड रोग व्यवस्थापनाच्या एकात्मिक पध्दती,खतांचे नियोजन, जमीनीची मशागत, काढणी नंतर फळांची प्रतवारी,कीड नियंत्रणात विविध सापळे यांचे महत्त्व, फळधारणेमधील मधमाशांचे महत्त्व याविषयी सखोल मार्गदर्शन केले,त्याच बरोबर शेतकर्‍यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन शंका समाधान केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ कृषि अधिकारी महेंद्र जगताप यांनी केले,शेतीशाळा आयोजन कृषि पर्यवेक्षक संजय कदम व कृषिसेविका तेजस्विनी बांगर यांनी केले,

याप्रसंगी मंडळ कृषि अधिकारी स्वप्निल बनकर, आत्माचे तंत्र व्यवस्थापक महेश रुपनवर,तर प्रगतशील शेतकरी हौशीराम आटोळे, शिवाजी मेरगळ,रघुनाथ आटोळे, परशुराम मेरगळ, लक्ष्मण आटोळे, शांताराम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.