…अन्यथा राज्यात पुन्हा लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध लावले जातील; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

कोरोना संसर्गाचा धोका कायम असताना आणि केंद्राकडून आगामी सणांच्या काळात निर्बंध लावण्याबाबत सूचना करण्यात आल्या असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील महत्त्वाचे विधान केले. नियम पाळा, अन्यथा राज्यात पुन्हा निर्बंध लावले जातील, असा इशारा उपमुख्यमंत्र्यांनी दिला.

    पुणे : कोरोना संसर्गाचा धोका कायम असताना आणि केंद्राकडून आगामी सणांच्या काळात निर्बंध लावण्याबाबत सूचना करण्यात आल्या असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील महत्त्वाचे विधान केले. नियम पाळा, अन्यथा राज्यात पुन्हा निर्बंध लावले जातील, असा इशारा उपमुख्यमंत्र्यांनी दिला.

    केरळ राज्यात निर्बंध कमी केल्याने तेथे मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडले. अलीकडेच एक सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. त्यामुळे तेथे बाधितांची संख्या वाढली असून परत निर्बंध लावण्याची वेळ आली आहे, अशी वेळ महाराष्ट्रावर येऊ नये, यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे, असे पवार म्हणाले.

    महाराष्ट्रात गोपाळकाला, गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी असे मोठे सण साजरे केले जाणार आहे. नागरिकांनी सण साजरे करताना काळजी घ्यावी. अन्यथा पुन्हा निर्बंध लावावे लागतील. कोरोनाचे सावट अद्याप कायम असल्याने नागरिकांनी दहीहंडी ते दिवाळी या सर्व सणांमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे अशी सूचना अजित पवार यांनी केली.