पूर्ववैमनस्यातून तरुणावर केला चाकू हल्ला, गोळी झाडून केली हत्या

विलास हा घराबाहेर फोनवर बोलत होता. तेवढ्यात तेथे तीन ते चार तरुण आले आणि विलासवर सपासप चाकू हल्ला केला. यामध्ये विलासच्या हात आणि पोटावर वार झाले. विलास घरात पळाला आणि स्वतःला घरात कोंडून घेतले.

भुसावळ : भुसावळ शहरात तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विलास चौधरी असे मृत तरुणाचे नाव आहे. या तरुणाची चाकूने हल्ला करुन आणि गोळीबार करुन हत्या करण्यात आली आहे. यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे.

विलास हा घराबाहेर फोनवर बोलत होता. तेवढ्यात तेथे तीन ते चार तरुण आले आणि विलासवर सपासप चाकू हल्ला केला. यामध्ये विलासच्या हात आणि पोटावर वार झाले. विलास घरात पळाला आणि स्वतःला घरात कोंडून घेतले. मात्र हल्लेखोरांनी त्याच्या घरावर दगडफेक करुन घराच्या मागील बाजूच्या खीडकीने घरात घुसले. यावेळी त्यांनी गावठी पिस्तुलीने विलासवर गोळीबार केला आणि पसार झाले.

या घटनेची माहिती पोलीसांना मिळाल्यावर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तरुणाला खाजगी रुग्णालयात दाखल केले तसेच डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले. पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे.