बारामती गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगिरी  ७ लाखाचा गुटखा जप्त

बारामती औद्योगिक वसाहत परीसरात बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून टाकलेल्या छाप्यात ८ लाख ९८ हजाराचा गुटखा मुद्देमालासह जप्त करून एकास अटक करण्यात आली आहे

    बारामती : बारामती औद्योगिक वसाहत परीसरात बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून टाकलेल्या छाप्यात ८ लाख ९८ हजाराचा गुटखा मुद्देमालासह जप्त करून एकास अटक करण्यात आली आहे.

    पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती तालुका पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला बातमीदारा मार्फत गोपनीय माहिती मिळाली की, बारामती औद्योगिक वसाहतीतील कंपनीच्या परीसरात एका पिक अप जीपमधून अनोळखी इसम गुटखा व पान मसाला विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने सापळा रचला. यावेळी त्याठिकाणी असलेल्या पिक अप जीपमधील (क्र एम. एच २४,ए.यु ३८६८) पाच गोणीमध्ये १ लाख ९८ हजार रुपये किंमतीचे विमल पान मसाला गुटख्याचे ७ लाख रुपये किंमतीचे १ हजार पुडे, तसेच एक महिंद्रा कंपनीची जीप असा एकुण ८ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच ज्ञानदेव ग्यानबा बंडगर (वय २१,रा मशिन घरकुल एमआयडी,अक्कलकोट रोड, सोलापूर) याला अटक केली आहे. सदरची कारवाई जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश ढवाण, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलिस हवालदार दादासाहेब ठोंबरे, राहुल पांढरे, नंदू जाधव, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे यांनी केली आहे.