शेतीच्या बांधाच्या वादातून पिता पुत्रास मारहाण

मंचर : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील पारगाव-शिंगवे येथील कारवस्ती येथे शेतीच्या बांधाच्या कारणावरुन पितापुत्रास मारहाण झाल्याची केल्या प्रकरणी सहा जणांविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मंचर : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील पारगाव-शिंगवे येथील कारवस्ती येथे शेतीच्या बांधाच्या कारणावरुन पितापुत्रास मारहाण झाल्याची केल्या प्रकरणी सहा जणांविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवार (दि.२८) रोजी बाबाजी ढोबळे यांनी शेती गटनंबर ६१४ मध्ये नांगरणी करत असताना मच्छिंद्र बबन दातखिळे, राहुल मच्छिंद्र दातखिळे, केतन मच्छिंद्रनाथ दातखिळे,पंढरीनाथ मारुती दातखिळे,नवनाथ विठ्ठल दातखिळे, रेवननाथ विठ्ठल दातखिळे हे सर्वजण शेतावर आले. त्यांनी शेत नांगरणी करायची नाही. असे म्हणत दगडू ढोबळे व त्यांचा मुलगा प्रदिप ढोबळे याला शिवीगाळ करत लाथा बुक्याने मारहाण केली. स्थानिक शेतकऱ्यांनी भांडणे सोडवली. पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जवान सागर गायकवाड करत आहेत.