सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तयार होणार ऑक्सिपार्क योजना; नागरिकांना लुटता येणार ‘या’ गोष्टींचा आनंद

ऑक्सिपार्क योजनेच्या माध्यमातून पुणेकरांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेण्यात येतील. त्यामुळे या योजनेचा नागरिक आणि विद्यापीठ दोघांनाही फायदा होणार आहे. योजनेत सहभागी नसलेल्या नागरिकांनाही फिरायला येता येणार आहे. विद्यापीठ सर्वांसाठी खुले आहे- कुलगुरू डॉ नितीन करमळकर

  पुणे: पुण्यातील निसर्गरम्य परिसरांपैकी एका असलेले एक ठिकाण म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ होय. तब्बल ४०० एकरांमध्ये बसलेल्या या विद्यापीठामध्ये अनेक दुर्मिळ झाडे असून शहराच्या वेगवेगळ्या भागातून अनेक नागरिक येथे व्यायाम जॉगिंगसाठी येत असतात , विद्यापीठात येणाऱ्या अश्या अनेक लोकांसोबत ऋणानुबंध जोपसण्यासाठी विद्यापीठ परिसरात ऑक्सिपार्क योजना सुरू करण्यात येणार आहे. सशुल्कपणे राबवण्यात येणाऱ्या या योजनेमुळे विद्यापीठाचे उत्पादन वाढवण्यासही मदत होणार आहे.

  या सुविधा  काय मिळणार 
  – सशुल्कपणे या योजना होण्यासाठी नागरिकांना नोंदणी करावी लागेल.

  – योजनेत सहभागी झालेल्या नागरिकांना विद्यापीठात विविध सोईसुविधांचा लाभ घेता येणार आहे.

  – सहभागी नागरिकांचा विद्यापीठाच्या प्रशासनाशी थेट संबंध वाढणार आहे.

  – यातील सहभागी नागरिकांमुळे विद्यापीठाचे ब्रॅण्डिंग होण्यासही मदत होणार आहे.

  – योजने अंतर्गत क्रीडांगण, ग्रंथालय, वैद्यकीय सेवा या सुविधांबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणार आहे.

  ऑक्सिपार्क योजनेच्या माध्यमातून पुणेकरांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेण्यात येतील. त्यामुळे या योजनेचा नागरिक आणि विद्यापीठ दोघांनाही फायदा होणार आहे. योजनेत सहभागी नसलेल्या नागरिकांनाही फिरायला येता येणार आहे. विद्यापीठ सर्वांसाठी खुले आहे- कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांनी दिली आहे.