पडळकर यांनी शरद पवार यांची माफी मागावी अन्यथा राज्यात फिरू देणार नाही

-हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा लोणी काळभोर : अनामत रक्कम जप्त झालेल्या आमदारानी लहान तोंडी मोठा घास घेवू नये पंतप्रधानांपासून ते केंद्रातील मंत्रिमंडळातील मंत्री शरद पवारांचा सल्ला

-हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा 

लोणी काळभोर : अनामत रक्कम जप्त झालेल्या आमदारानी लहान तोंडी मोठा घास घेवू नये पंतप्रधानांपासून ते केंद्रातील मंत्रिमंडळातील मंत्री शरद पवारांचा सल्ला घेवून कारभार चालवत आहेत. परंतु भाजपच्या दारात गळ्यात पट्टा घालून साखळी घातलेल्या भूकणाऱ्याला महाराष्ट्र दाद देणार नाही. गोपीचंद पडळकर यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात फिरु देणार नाही असा इशारा हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला. 

  आमदार गोपीचंद पडळकर यांनी लोकनेते शरद पवार यांच्या विषयी केलेल्या विधानाबद्दल जाहीर निषेध नोंदवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांनी यापुढे आपली योग्यता – आपली क्षमता पाहून बोलावे. भाजपनं पडळकर यांना आमदार का केले याचं उत्तर आज राज्याला समजले परंतु राष्ट्रवादीचा कार्यकर्ता शरद पवारांविषयी बोलणाऱ्याची गय करणार नाही.मागच्या दाराने आमदार झालेल्यानी तोंडाला आवर घालुन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची माफी मागावी व राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी यावेळी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.

   याप्रसंगी हवेली तालुका पंचायत समितीचे उपसभापती सनि काळभोर, हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष नंदकुमार काळभोर, रा.कॉ.ग्राहक संरक्षण समितीचे प्रदेश अध्यक्ष सूर्यकांत गवळी,आप्पासाहेब काळभोर, तंटामुक्ती अध्यक्ष अमित कांचन, सोनबा चौधरी, स्मिता नॉर्टन, अमित बाबा कांचन,संजय आबा चौधरी,आनंद अण्णा महाडिक,रामभाऊ तुपे,सागर कांचन, ऋषिकेश काळभोर,सनी चौधरी हे उपस्थित होते.