पालखी मार्ग होणार ”हरित मार्ग”

लोणी काळभोर : यंदा कोरोना या संसर्गामुळे पंढरीची वारी होऊ शकली नाही परंतु वृक्षांमध्येच विठ्ठलाचा वास असतो.ही वारी वृक्षारोपण करुन आंळदी ते पंढरपुर पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याची मोहीम

लोणी काळभोर :  यंदा कोरोना या संसर्गामुळे पंढरीची वारी होऊ शकली नाही परंतु वृक्षांमध्येच विठ्ठलाचा वास असतो.ही वारी वृक्षारोपण करुन आंळदी ते पंढरपुर पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याची मोहीम सयाजी देवराई संस्थेच्या माध्यमातून सुरू केली असल्याची माहिती सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी दिली. लोणी काळभोर येथे संत तुकाराम महाराज पालखी स्थळ याठिकाणी सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी ते बोलत होते. 

देहु संस्थान व आंळदी देवस्थान यांच्या मदतीने देहु-आंळदी ते पंढरपुर या मार्गावरील पालखी विसावा व मुक्कामाच्या ठिकाणी वृक्षारोपण करण्याची मोहीम सयाजी देवराई संस्थेच्या माध्यमातून सुरू केली आली.यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की दरवर्षी पालखी सोहळ्यात वारकरी मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन विठुरायाचा नाम घोष करीत मैलोंमैल पायी प्रवास करत असतात त्यांना ती उर्जा  भक्ती भावातुन, निसर्गाच्या सान्निध्यातुन मिळत असते. पुढील काळात त्यांना ही उर्जा वृक्ष रुपातुन मिळावी, पायी चालणार्या वारकरी मंडळीना त्या वृक्षाखाली सावलीचा आधार घेता येईल ह्या भावनेतुन सयाजी देवराई संस्थेच्या माध्यमातून सर्व पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. 

  लोणी काळभोर येथील पालखी स्थळावर वृक्षारोपण करतेवेळी तुकाराम महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष शिवाजी मोरे,माणिक महाराज मोरे,आंळदी देवस्थानचे विश्वस्त विकास ढगे,अभय टिळक, मधुकर मोरे, पंचायत समिती हवेलीचे उपसभापती युगंधर काळभोर, कदम वाकवस्ती व लोणी काळभोरच्या सरपंच गौरी गायकवाड, अश्विनी गायकवाड, आण्णासाहेब काळभोर, राजेंद्र काळभोर, चित्तरंजन गायकवाड, अविनाश बडदे, ग्रामसेवक डी के पवार, प्रविण देसाई,रयत क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत काळभोर, शिवसेनेचे शहर प्रमुख संतोष भोसले  तसेच दोन्ही गावाचे ग्रामपंचायत सदस्य व सयाजी देवराई संस्थेचे कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.