कावळे अचानक मृत्युमुखी पडल्याने दिघीतील नागरिकांमध्ये घबराट

महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे म्हणाले, दिघीत शुक्रवारपासून कावळे मरून पडत आहेत. पहिल्या दिवशी १० कावळे दगावले. त्यानंतर चार ते पाच कावळे दिवसाला मृत्युमुखी पडत आहेत. मृत कावळ्यांचे नमुने शुक्रवारी, शनिवारी आणि आज पुन्हा तपासणीसाठी औंधला पाठविले आहेत. त्याचे अहवाल अद्याप आले नाहीत. अहवाल आल्यानंतर नेमके कारण कळेल. बर्ड फ्ल्युची लक्षणे नाहीत. नागरिकांनी कावळ्यांना हात लावू नये. आरोग्य विभागाचे कर्मचारी कावळे घेवून जात आहेत. त्याची विल्हेवाट लावत आहेत. घाबरण्याचे काही कारण नाही.

    पिंपरी :  दिघीतील बी.यू. भंडारी गृहनिर्माण सोसायटी परिसरात मागील सात ते आठ दिवसांपासून कावळे मरून पडत आहेत. हवेतून उडून कावळे खाली पडतात. दोन पायावरून अचानक एका पायावर उभे राहतात आणि मृत्युमुखी पडतात. कावळ्यांना ‘फूड पॉयजनिंग’ झाले असण्याची किंवा संसर्गजन्य रोगाची शक्यता पशुतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळे दिघी परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.

    दिघीत बी.यू. भंडारी गृहनिर्माण सोसायटी आहे. तिथे झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. या परिसरात मागील सात ते आठ दिवसांपासून दहा ते १२ कावळे मरून पडत आहेत. हवेतून उडून कावळे खाली पडतात. दोन पायावरून अचानक कावळे एका पायावर उभे राहतात आणि मृत्युमुखी पडतात. दररोज एकाच ठिकाणी कावळे मरून पडत आहेत. १० ते १२ कावळे दिवसाला मरत आहेत. पशुवैद्यकीय आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. कावळ्यांना फूड पॉयजनिंग झाल्याचा किंवा संसर्गजन्य रोग असण्याची शक्यता पशुतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ही गोष्ट सहजासहजी घेऊ नये. याच्यातून कदाचित दुसरा एखादा संसर्गजन्य रोग होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिका आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मरून पडलेले कावळे उचलताना काळजी घेण्याचे आवाहन पशुतज्ज्ञांनी केले आहे. शवविचछेदन अहवाल आला नसल्याचे महापालिका अधिकारी सांगत आहेत.

    स्थानिक नगरसेवक विकास डोळस म्हणाले, आठ दिवसांपासून दररोज एकाच ठिकाणी कावळे मरून पडत आहेत. १० ते १२ कावळे मरत आहेत. कात्रजवरून पशुवैद्यकीय आणि वन विभागाचे अधिकारी आज पाहणीसाठी आले होते. कावळ्यांना फूड पॉयजनिंग झाले असू शकते. कदाचीत यातून संसर्गजन्य रोग पण होऊ शकतो. पशु वैद्यकीय विभागाने पोस्टमॉर्टम रिपोर्ट लवकर मिळवावा. फूड पॉयजनिंगने कावळे मरतात की दुसरे कोणाचे कारण आहे हे स्पष्ट झाले पाहिजे. संसर्गजन्य रोग असेल. तर, ते लवकर कळले पाहिजे. त्यामुळे भविष्यात होणारी हानी टाळता येईल.