parks in pune city will remain closed for month
पुणे शहरातील उद्याने (parks) महिनाभर बंदच राहणार

पुणे शहरातील (pune city) उद्याने (parks) सुरू (opens) करण्याचा पुणेकरांचा आग्रह असला; तरी ती येत्या ३० ऑक्‍टोबरपर्यंत बंदच राहणार असल्याचे महापालिका (pune mahapalika) प्रशासनाने स्पष्ट केले. मनोरंजनाची ठिकाणे सुरू करण्यास राज्य सरकारने (state government) नकार दिल्याचे सांगत, उद्यानाचा निर्णय होणार नसल्याचेही सांगण्यात आले. उद्याने उघडण्याच्या हालचाली महापालिकेने गेल्या आठवड्यात केल्याने पुणेकरांत उत्सुकता होती. मात्र ती आता आणखी महिनाभर तरी बंद राहतील.

पुणे : पुणे शहरातील उद्याने सुरू करण्याचा पुणेकरांचा आग्रह असला; तरी ती येत्या ३० ऑक्‍टोबरपर्यंत बंदच राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. मनोरंजनाची ठिकाणे सुरू करण्यास राज्य सरकारने नकार दिल्याचे सांगत, उद्यानाचा निर्णय होणार नसल्याचेही सांगण्यात आले. उद्याने उघडण्याच्या हालचाली महापालिकेने गेल्या आठवड्यात केल्याने पुणेकरांत उत्सुकता होती. मात्र ती आता आणखी महिनाभर तरी बंद राहतील.

कोरोना आणि त्यानंतरच्या लॉकडाउनमुळे गेल्या सहा-साडेसहा महिन्यांपासून सर्व उद्याने पूर्णपणे बंद आहेत. अनलॉकच्या पाचव्या टप्प्यात बहुतांशी व्यवहार सुरू झाल्याने उद्याने, मैदाने खुली करण्याची मागणी पुणेकरांची आहे. त्यानुसार काही बंधने घालून उद्याने उघडता येतील का, या दृष्टीने महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. त्यासाठी बैठक घेऊन निर्णय जाहीर करू, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी जाहीर केले होते. परंतु, कोरोनाचा संसर्ग, त्याचे परिणाम आणि उद्याने उघडल्यानंतरच्या संभाव्य परिणामांचा विचार करून निर्णय घेणार असल्याचे मोहोळ यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतरी उद्याने उघडण्याला पुणेकरांची सर्वाधिक पसंती असल्याचे दिसून आले.

मात्र अनलॉकच्या पाचव्या टप्प्याची नियमावली जाहीर करताना मनोरंजनाची ठिकाणे येत्या ३० ऑक्‍टोबरपर्यंत बंद असतील, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे विविध भागांमधील १९० उद्याने अजूनही बंदच राहणार आहेत.

राज्य सरकारच्या आदेशानुसार पुणेकरांना नव्या काही सवलती देण्याचा निर्णय झाला आहे. त्यात उद्याने सुरू करण्याचा आदेश नाही. त्यामुळे पुढचे काही दिवस उद्याने बंद ठेवणार आहेत.

- अशोक घोरपडे, उद्यान विभागप्रमुख, पुणे महापालिका