पुण्यातील उद्याने पुन्हा होणार बंद

महापालिका प्रशासनाने घेतला निर्णय पुणे : महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या मागणीनुसार महापालिका प्रशासनाने उद्याने पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्यान

महापालिका प्रशासनाने घेतला निर्णय
पुणे :
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या मागणीनुसार महापालिका प्रशासनाने उद्याने पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्यान विभागाने हा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी २ जून रोजी नागरिकांना फिरण्यासाठी आणि जॉगिंगसाठी शहरातील ३१ उद्याने सुरू करण्याचा आदेश दिला होता. तसेच उद्यानात असलेल्या ओपन जीम सुद्धा सुरु झाल्या होत्या. कोरोना मुळे लॉकडाऊनच्या कालावधीत उद्याने बंद ठेवली होती. सुमारे दोन महीन्यानंतर उद्याने सुरू झाल्यामुळे नागरिकांची उद्यानात गर्दी वाढू लागली होती. जॉगिंगसाठी येणाऱ्यांची गर्दी होत असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची धोका निर्माण झाला होता. लॉकडाऊन शिथील करून काही सवलती देताना शहरातील उद्याने सुरू करण्यात आली आहेत. त्यात प्रवेश देताना काही बंधने घातली आहेत. मात्र, नागरिकांकडून योग्य काळजी घेतली जात नसल्याचे समोर आले आहे. याशिवाय कमी मनुष्यबळ असतानाही उद्यानासाठी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त्यामुळे सुरू केलेली उद्याने पुन्हा बंद करण्याची मागणी महापौर मोहोळ यांनी आयुक्तांकडे केली होती. ही मागणी प्रशासनाने मान्य करीत असल्याने पुढील आदेश येईपर्यंत उद्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.