भागीदार करून घेण्याच्या; बहाण्याने महिलेची फसवणूक

महिलेकडून त्यापोटी २५ लाख रुपये घेतले. पैसे घेऊन महिलेला व्यवसायात भागीदार करून घेतले नाही. तसेच घेतलेले पैसे परत न देता त्यांची फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

    पिंपरी: वॉटर प्युरिफायरच्या व्यवसायात भागीदार करून घेण्याच्या बहाण्याने एका महिलेकडून २५ लाख रुपये घेतले. मात्र, महिलेला भागीदार करून न घेता तसेच घेतलेले पैसे परत न देता तिची फसवणूक केल्याची घटना प्राधिकरण निगडी येथे घडली. चंद्रकांत महादेव मोरे (वय ५५, रा. प्राधिकरण निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत मोनिका ओमप्रकाश अग्रवाल (वय ३५, रा. कल्याण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोरे हा बिग व्हिजन आरओ वॉटर प्युरिफायर या कंपनीत मॅनेजिंग डायरेक्टर आहे. त्याने फिर्यादी महिलेला त्याच्या व्यवसायात भागीदार म्हणून घेण्याचे आमिष दाखवले. तसेच महिलेकडून त्यापोटी २५ लाख रुपये घेतले. पैसे घेऊन महिलेला व्यवसायात भागीदार करून घेतले नाही. तसेच घेतलेले पैसे परत न देता त्यांची फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.