पुण्यात चक्क बसस्टॉपवर झोपलेल्या प्रवाशाची हत्या, धारदार शस्त्राने डोक्यात आणि डोळ्यांवर वार

संजय कदम(Sanjay kadam) हे शिरुर तालुक्यातील(Shirur) आंबेगाव(Ambegav) याठिकाणी एका हॉटेलमध्ये काम करतात. सोमवारी ते आपल्या घरी मुंबईला चालले होते. पण रात्री उशीर झाल्यानं त्यांना बस मिळाली नाही. त्यामुळे रात्रीचा मुक्काम बसस्टॉपवरच(Murder On Busstop) काढायचा त्यांनी ठरवलं.

    पुणे : रात्री उशीरा मुंबईला जाण्यासाठी बस न मिळाल्यानं बसस्टॉपवर(BusStop) झोपलेल्या (Passenger slept at bus stop) एका प्रवाशाची निर्घृण हत्या (Murder Of A Passenger) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सकाळी ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या घटनेची माहिती मृताच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. घटनेचा तपास सुरू केला आहे. चोरीच्या उद्देशानं ही हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे अज्ञात आरोपीचा शोध सुरु आहे.

    संजय कदम असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून ते घाटकोपर येथील रहिवासी आहेत. मृत संजय कदम हे शिरुर तालुक्यातील आंबेगाव याठिकाणी एका हॉटेलमध्ये काम करतात. सोमवारी ते आपल्या घरी मुंबईला चालले होते. पण रात्री उशीर झाल्यानं त्यांना बस मिळाली नाही. त्यामुळे रात्रीचा मुक्काम बसस्टॉपवरच काढायचा त्यांनी ठरवलं. ते साधू वासवाणी चौकातून अलंकार चित्रपटगृहाकडे जाणार्‍या रस्त्यावरील विजय सेल्स या दुकानासमोरील बस स्टॉपवर झोपले होते.मध्यरात्री एका अज्ञात व्यक्तीनं त्यांच्या डोक्यात आणि डोळ्यावर धारदार शस्त्रानं वार करत, त्यांची हत्या केली आहे.

    मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अधिक माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी सांगितलं की, मृत संजय कदम यांच्या खिशात एका मोबाईल नंबर आढळून आला होता. त्यावर संपर्क साधला असता मृताची ओळख पटली आहे. पोलीस अज्ञात हल्लेखोराचा शोध घेत आहेत.