जम्बो हॉस्पिटल, ऑटो क्लस्टरमध्ये दाखल रुग्ण जिवंत परततच नाही; सर्वपक्षिय नगरसेवकांचे स्वानुभव कथन

महापालिकेच्या आशिर्वादाने चालणा या ऑटो क्लस्टर हॉस्पिटलमध्ये खाटांसाठी रुग्णांकडून पैसे उकळले जातात. यामध्ये ज्यांची भागीदारी आहे, त्या नगरसेवकांचे पद रद्द कर . त्यांच्यावरही गुन्हा दाखल करा ; अन्यथा आयुक्तांवर गुन्हा दाखल केला जाईल. अशी मागणी ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांनी केली आहे.

  पिंपरी: पिंपरी – चिंचवड महापालिकेने ‘स्पर्श’ आणि ‘मेडब्रो’ या खासगी संस्थेकडे सोपविलेल्या चिंचवड येथील ऑटो क्लस्टर आणि नेहरूनगर जम्बो हॉस्पिटलमध्ये अनागोंदी कारभार सुरु आहे. कोरोना रुग्णांच्या जीवावर बेतेल अशी रुग्णसेवा आहे. या ठिकाणी दाखल केलेले रुग्ण जिवंत परत येतच नाही तर त्यांचे मृतदेहच नातेवाईकांना पाहायला मिळतात, असे स्वानुभव सर्वपक्षिय नगरसेवकांनी कथन करत ‘स्पर्श’ आणि ‘मेडब्रो’ व्यवस्थापनाचा पंचनामा केला. खासगी संस्थांकडून कोविड सेंटरचे कंत्राट काढून घेत महापालिका वैद्यकीय विभागाकडे सोपवा, अशी मागणी यावेळी सत्ताधारी भाजपसह सर्वपक्षीय नगरसेवकांनी लावून धरली.

  नुकतीच महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे महापालिकेचे कोविड हॉस्पिटल सुरू केले आहे. स्पर्श संस्था त्याचे संचलन करते. चिखली येथील महापालिका शाळेच्या निवृत्त मुख्याध्यापिकेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मोफत उपचार होत असलेल्या या हॉस्पिटलमध्ये मुख्याध्यापिकेला ‘आयसीयू बेड’ देण्यासाठी एक लाख रुपये घेतल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला होता या प्रकरणावरून महासभेत तिखट चर्चा झाली. नगरसेवकांनी सतांप व्यक्त करत स्पर्श आणि मेडब्रोच्या कारभाराचे वाभाडे काढले.

  महापालिका मुख्याध्यापिकेला खाट उपलबद्ध बेड देण्यासाठी एक लाख रुपये घेतले जातात हे दुर्देव आहे. चोरांना पाठीशी घालम नका. या प्रकरणात दरोडा, चोरी, खंडणीचा गुन्हा दाखल करा. स्पर्श व्यवस्थापनावर योग्य वेळीच कारवाई झाली असती. तर, आज ही आफत ओढावली नसती. शिवसेना नगरसेविका मिनल यादव म्हणाल्या, ऑटो क्लस्टर आणि जम्बो हॉस्पिटलमध्ये अनेकदा फोन केले. एकदाही खाट उपलब्ध झाली नाही. ऑटो क्लस्टर आणि जम्बो कोविड सेंटर कोणाच्या बापाचे नाही.तर शिवेनेचे सचिन भोसले म्हणाले, स्पर्श व्यवस्थापनालला कोणाचा पाठिंबा आहे याचे देणेघेणे नाही. मयताच्या टाळूवरचे लोणी खाNयाच्या संस्थांकडून त्वरित काम काढून घ्या. लाचखोर डॉक्टर पैसे घेऊन खाटा मिळवून देत आहेत. यात मोठे रॅकेट आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. ‘स्पर्श’वर गुन्हा दाखल झाला पाहिजे.तर, ऑटो क्लस्टर आणि जम्बो कोविड सेंटर हे ‘डेड हाऊस’ झाल्याची टीका आशा शेंडगे यांनी केली. संदीप वाघेरे म्हणाले, कोरोना महामारीत स्पर्श व्यवस्थापनाची दुकानदारी सुरू आहे. हे मयताच्या टाळूवरचे लोणी नव्हे तर संपूर्ण प्रेतच खात आहेत.असल्याची टीका शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केली आहे.

  एक लाख रुपये घेतल्याच्या प्रकरणाचा भांडाफोड करणाऱ्या कुंदन गायकवाड यांनी संभाषणाची ध्वनीफीतच ऐकविली. ते म्हणाले, ऑटो क्लस्टरमध्ये फक्त काळा बाजार सुरू आहे. रूग्णांना मोबाईल घेऊन जावू दिले जात नाही. बाऊन्सर नेमले आहेत. मला शिकविणाऱ्या शिक्षिकेकडून एक लाख रुपय उकळले. त्यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला पाहिजे. तर, विकास डोळस यांनी स्पर्श व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून करार रद्द करा, अ

  महापालिकेच्या आशिर्वादाने चालणा या ऑटो क्लस्टर हॉस्पिटलमध्ये खाटांसाठी रुग्णांकडून पैसे उकळले जातात. यामध्ये ज्यांची भागीदारी आहे, त्या नगरसेवकांचे पद रद्द कर . त्यांच्यावरही गुन्हा दाखल करा ; अन्यथा आयुक्तांवर गुन्हा दाखल केला जाईल. अशी मागणी ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांनी केली आहे.

  ऑटो क्लस्टर येथील कोविड सेंटरमध्ये भयानक कारभार सुरू आहे. टोळी बनवून काही जण सर्वसामान्य जनतेची लुट करत आहेत. एक लाख रुपये घेतल्याचे पुराव्यानिशी सिद्ध करणाऱ्या कुंदन गायकवाड यांना हे प्रकरण मिटविण्यासाठी लाखो रूपयांचे अमिष दाखविण्यात आले. सभागृहनेते नामदेव ढाके मांडवली करतात, भ्रष्टाचाराचे समर्थन करतात. लोकांचे जीव घेऊन पैसे कमविणाऱ्यांचे भाजपची मंडळी समर्थन करतात, असा हल्लाबोल माजी महापौर योगेश बहल यांनी केला