पवना धरण १०० टक्के भरले

वर्षी चार सप्टेंबर पर्यंत १ हजार ५९५ मिलिमीटर पाऊस पडला होता. पवना धरणातून सध्या पावर हाउससाठी १ हजार ३२६ क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

    पिंपरी:  पिंपरी – चिंचवड शहराची तहान भागवणारे पवना धरण १०० टक्के भरले आहे. धरणात सध्या २७२.११ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा आहे. भीमा नदी खोरे प्रकल्पातील पाच धरणे १०० टक्के भरली आहेत. पवना धरणात सध्या २४०.९६ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ८.५१ टीएमसी एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. तर ३१.१५ दशलक्ष घनमीटर एवढा अचल पाणीसाठा आहे.

    पवना धरण क्षेत्रात शनिवारीरोजी २९ मिलिमीटर पाऊस पडला. एक जून पासून पवना धरण क्षेत्रात २ हजार २१५ मिलिमीटर पावसाची नोंद आहे. मागील वर्षी चार सप्टेंबर पर्यंत १ हजार ५९५ मिलिमीटर पाऊस पडला होता. पवना धरणातून सध्या पावर हाउससाठी १ हजार ३२६ क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. भीमा नदी खोरे प्रकल्पातील २६ धरणांपैकी कळमोडी, आंद्रा, पवना, नीरा देवधर ही पाच धरणे शंभर टक्के भरली आहेत. तर चासकमान, भामा आसखेड, कासारसाई, टेमघर, पानशेत, गुंजवणी, भाटघर ही सात धरणे ९० टक्क्यांपेक्षा अधिक भरली आहेत.