लॉकडाऊन''मध्येही घरबसल्या वीजबिल मिळविणे, ''ऑनलाईन'' भरणे झाले सुकर

पुणे : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे गेल्या २३ मार्चपासून महावितरणने वीजबिलांची छपाई व वितरण बंद केले आहे.

 पुणे : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे गेल्या २३ मार्चपासून महावितरणने वीजबिलांची छपाई व वितरण बंद केले आहे. मात्र महावितरणने मोबाईल अॅप, वेबसाईट व ‘एसएमएस’द्वारे वीजग्राहकांना घरबसल्या वीजबिल मिळविणे व ते ‘ऑनलाईन’ भरण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.

पुणे परिमंडल अंतर्गत पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर तसेच पुणे ग्रामीणमधील मुळशी, वेल्हे, मावळ, जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यांत कृषी व अकृषक वर्गवारीतील २७ लाख ८७ हजार २०४ (९०.४७) वीजग्राहकांनी महावितरणकडे ग्राहक क्रमांकासोबत त्यांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे. लॉकडाऊनमध्ये या ग्राहकांना वीजबिलांची माहिती ‘एसएमएस’द्वारे देण्यात येत आहेत.

पुणे शहरामधील कोथरूड, शिवाजीनगर, रास्तापेठ, नगररोड, पद्मावती, पर्वती, बंडगार्डन या महावितरणच्या विभागांमधील १४ लाख ८८ हजार २११ (८९.८२ टक्के) ग्राहकांनी, पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी व व पिंपरी विभागातील ६ लाख १५ हजार ग्राहकांनी तसेच पुणे ग्रामीण मंडल अंतर्गत मुळशी, वेल्हे, मावळ, जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यांतील ६ लाख ८३ हजार ९६८ वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे.