जैव वैद्यकीय घनकचरा विल्हेवाटीचा दर वाढविण्यासाठी पिंपर चिंचवड महापालिकेने केली विशेष समितीची नेमणूक

महापालिकेच्या वैद्यकीय विभागाअंतर्गत नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी शहरात ३२ दवाखाने आहेत. तर, आठ रूग्णालये आहेत. या रूग्णालयांसह संलग्न रूग्णालयांमधून जैव वैद्यकीय घनकचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. हा जैव वैद्यकीय घनकचरा गोळा करणे आणि त्याची विल्हेवाट लावणे या कामासाठी पास्को या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे.

    पिंपर चिंचवड महापालिका हद्दीतील जैव वैद्यकीय घनकचरा विल्हेवाटीचा दर वाढविण्याकरिता आणि इतर संलग्न कामासाठी बायोमेडीकल वेस्ट डिस्पोझेबल समितीची नेमणूक केली आहे. त्यानुसार, कचरा विल्हेवाटीचे कामकाज करणाऱ्या संस्थेस करारनामा कालावधीत दरवाढ द्यायची की नाही याबाबतचा निर्णय समितीमार्फत घेतला जाणार आहे.

    महापालिकेच्या वैद्यकीय विभागाअंतर्गत नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी शहरात ३२ दवाखाने आहेत. तर, आठ रूग्णालये आहेत. या रूग्णालयांसह संलग्न रूग्णालयांमधून जैव वैद्यकीय घनकचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. हा जैव वैद्यकीय घनकचरा गोळा करणे आणि त्याची विल्हेवाट लावणे या कामासाठी पास्को यांना कंत्राट देण्यात आले आहे.

    हा प्रकल्प बांधा, विकसित करा आणि वापरा या तत्वावर पास्को यांना चालविण्यास देण्यात आला. १ एप्रिल २००५ पासून जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाटीचे सर्व कामकाज ते करत आहेत. २१ फेब्रुवारी २००६ रोजी पास्को यांच्यासमवेत केलेला करारनामा आणि दिलेला आदेश रद्द करून त्यांनी विनंती केल्यानुसार, पास्को एन्व्हायरलमेंटल सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या समवेत करारनामा करून कामाचा आदेश देण्यात आला आहे.

    कामात सुसुत्रता आणण्यासाठी करारनाम्यानुसार, तीन महिन्यांकरिता आगाऊ रक्कम देण्यात येऊन त्याचे समायोजन करण्यात येत होते. तथापि, बीलामध्ये सुसुत्रता राहण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या मान्यतेने ऑक्टोबर २००९ पासून पास्को एन्व्हायरलमेंटल यांना प्रति महिना बील देण्यात येत आहे. महापालिका हद्दीतील रूग्णालये आणि महापालिका रूग्णालयांसह इतर संलग्न जैव वैद्यकीय संस्थांमधून निर्माण होणाऱ्या जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन मोशी येथे जैव वैद्यकीय घनकचरा विल्हेवाटीचा प्रकल्प स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. पास्को एन्व्हायरलमेंटल यांना चालू अटी-शर्तींवर नवीन प्रकल्प स्थापन करून पुढील १५ वर्षासाठी संचालन करण्यास १३ ऑक्टोबर २०२० रोजी मान्यता देण्यात आली आहे.

    मोशी येथील जागेचा भाडेकरार १५ जून २०१२ ते १४ जून २०२७ या कालावधीकरिता केला आहे. ही मुदत संपुष्टात येण्यापूर्वी नव्याने केलेल्या करारनामा कालावधीपर्यंत म्हणजेच २८ पेâब्रुवारी २०३५ पर्यंत मुदतवाढ करण्यासाठी सक्षम समितीची मान्यता घ्यावी लागणार आहे. जैव वैद्यकीय घनकचरा विल्हेवाटीचा दर वाढविण्याकरिता आणि इतर संलग्न कामासाठी बायोमेडीकल वेस्ट डिस्पोझेबल समितीची नेमणूक केली आहे. या समितीमध्ये मुख्य लेखापरिक्षक, मुख्य व लेखा वित्त अधिकारी, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी, वायसीएम रूग्णालय वैद्यकीय अधिक्षक यांचा समावेश आहे. त्यानुसार, करारनामा कालावधीत डिस्पोझेबल समितीने दिलेल्या निर्णयानुसार, दरवाढ करण्यात येणार आहे.