मास्क आणि सॅनिटायझर. प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात रोजच्या रोज वापरण्याच्या गोष्टींमध्ये या दोन बाबींची भर पडली ती याच वर्षी. घरून निघताना ‘मास्क आणि सॅनिटायझर घेतलं का?’ अशी आठवण करून दिली जाऊ लागली. नव्या लाईफस्टाईलचा या दोन गोष्टी भाग बनल्या.
मास्क आणि सॅनिटायझर. प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात रोजच्या रोज वापरण्याच्या गोष्टींमध्ये या दोन बाबींची भर पडली ती याच वर्षी. घरून निघताना ‘मास्क आणि सॅनिटायझर घेतलं का?’ अशी आठवण करून दिली जाऊ लागली. नव्या लाईफस्टाईलचा या दोन गोष्टी भाग बनल्या.

शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने महापालिकेने मागील वर्षी कोणतीही निविदा न मागविता, करारनामा न करता पुरवठाधारकांकडून थेट पद्धतीने कापडी मास्क, लाईफबॉय साबणवड्यांची खरेदी केली. एक मास्क दहा रुपयांना खरेदी केला. भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या संस्थाकडूनच झोपडीधारकांसाठी मास्कची खरेदी करण्यात आली. या मास्कचा दर्जा अतिशय निकृष्ट होता. तसेच मास्क वाटूनही झोपडपट्टीतील कोरोना नियंत्रणात राहिला नव्हता

    पिंपरी : कोविड महामारीत झोपडीधारकांना वाटप केलेल्या मास्क मध्ये ‘कोरोना कमिशन’ खाणाऱ्या सत्ताधारी भाजपला आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही मलिदा कमवायचा असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. झोपडीधारकांना सॅनिटायझर बाटल्या, फरशी पुसण्यासाठी लाईझॉल, हॅन्ड वॉश, नॅपकिन, कापडी मास्कचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाकडून या साहित्याची थेट पद्धतीने खरेदी करावी, असा ठराव स्थायी समितीने उपसूचनेसह मान्य केला आहे.

    शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने महापालिकेने मागील वर्षी कोणतीही निविदा न मागविता, करारनामा न करता पुरवठाधारकांकडून थेट पद्धतीने कापडी मास्क, लाईफबॉय साबणवड्यांची खरेदी केली. एक मास्क दहा रुपयांना खरेदी केला. भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या संस्थाकडूनच झोपडीधारकांसाठी मास्कची खरेदी करण्यात आली. या मास्कचा दर्जा अतिशय निकृष्ट होता. तसेच मास्क वाटूनही झोपडपट्टीतील कोरोना नियंत्रणात राहिला नव्हता. मास्क खरेदी आणि साबणवड्या खरेदीत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येत होता. या वादग्रस्त खरेदीची आयुक्तांनी चौकशी केली.

    कोरोना काळातही खरेदीप्रकरण गाजत असताना भाजपच्या ताब्यातील स्थायी समितीने पुन्हा एकदा झोपडीधारकांच्या नावे कमाई करण्याची संधी हेरली असल्याचं सांगितलं जातंय. झोपडीधारकांना स्वच्छता किट वाटप करावे, असा ठराव स्थायी समितीने बुधवारी संमत केला आहे. पिंपरी – चिंचवड शहरात ३७ घोषित आणि ३४ अघोषित अशा ७१ झोपडपट्या आहेत. त्यात ४९ हजार ८३ झोपड्या असून लोकसंख्या सुमारे दोन लाखांच्या आसपास आहे. झोपडपट्टीवासियांचे आरोग्य उत्तम राहण्याकरिता, कोरोना आजारापासून बचाव करण्यासाठी झोपडपट्टीतील कुटुंबाना स्वच्छता किट वाटप करावे. त्यामध्ये चार सॅनिटाझर हॅन्डी बाटल्या (सुगंधित), फरशी पुसण्यासाठी १ लाईझॉल बाटली, २ हॅन्डवॉश, २ नॅपकिन आणि १० कापडी मास्क पुरविण्यात यावेत, असं ठरलंय.

    महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ या संस्थेस थेट पद्धतीने पुरवठ्याचे कंत्राट देण्यात येणार आहे. ही खरेदी शहर सुधारणा विभागामार्फतच करण्यात यावी. शहरातील सर्व झोपडपट्टयातील कुटुंबांना हे साहित्य पुरविण्यात यावे, त्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता द्यावी, असे ठरावात नमूद केले आहे.