मार्केट यार्डातील ११ व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई ; फळविभागात कारवाई करून वसुल केला ६ हजार ४९० रुपये दंड

कोरोनामुळे मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना व्यापार करण्यासाठी बाजार समितीने नियमावली तयार केली आहे. त्यानुसार फळ, भाजीपाला विभागातील गाळे व्यापारासाठी एकदिवसाआड सुरू असतात. मात्र, मंगळवारी गाळ्याची पाकळी बंद असतानाही हे अकरा व्यापारी व्यापार करत असल्याचे निदर्शनास आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

    पुणे :  कोरोनामुळे केलेल्या नियमाचे उल्लंघन करून व्यवसाय करणाऱ्या ११ व्यापाऱ्यांवर मार्केट यार्डातील फळ विभागात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येकी ५९० प्रमाणे ६ हजार ४९० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांच्या आदेशानुसार फळ विभागप्रमुख बाबासाहेब बिबवे यांच्या मार्गदर्शनाखाली गटप्रमुख बाळासाहेब कोंडे यांनी ही कारवाई केली.

    कोरोनामुळे मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना व्यापार करण्यासाठी बाजार समितीने नियमावली तयार केली आहे. त्यानुसार फळ, भाजीपाला विभागातील गाळे व्यापारासाठी एकदिवसाआड सुरू असतात. मात्र, मंगळवारी गाळ्याची पाकळी बंद असतानाही हे अकरा व्यापारी व्यापार करत असल्याचे निदर्शनास आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. करोना परिस्थितीत नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असल्याचे गटप्रमुख बाळासाहेब कोंडे यांनी सांगितले. यापूर्वी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली. मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करावे. विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहान बाजार समितीच्या प्रशासनाच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे.