कविता, गीतगायनातून कोरोनाविषयी लोकजागरण

पुणे : ''स्वयंशिस्तीचे आंदोलन हे लादून घ्यावे स्वतःवरी'', ''कोरोनाची स्वारी आली भूमीवरी तेणे त्रस्त झाली जनता सारी'', ''संधी आली कोरोनाची सावध व्हा झडकरी'' अशा विविध काव्यरचना व गीतांच्या गायनातून कोरोनाविषयी लोकजागरण केले जात आहे.

 कवी चंद्रकांत शहासने यांचा अनोखा उपक्रम

पुणे : ‘स्वयंशिस्तीचे आंदोलन हे लादून घ्यावे स्वतःवरी’, ‘कोरोनाची स्वारी आली भूमीवरी तेणे त्रस्त झाली जनता सारी’, ‘संधी आली कोरोनाची सावध व्हा झडकरी’ अशा विविध काव्यरचना व गीतांच्या गायनातून कोरोनाविषयी लोकजागरण केले जात आहे. पुण्याच्या अष्टावधानी संतुलन फोंडेशन आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टचे माध्यमातून कोरोना विषाणू संदर्भात सोशल मिडियाच्या माध्यमातून हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. संस्थेचे विश्वस्त चंद्रकांत शहासने यांनी स्वरचित कवितांच्या माध्यमातून हा उपक्रम चालू केला.

चालू घडामोडींवर आधारित काव्यरचनेतून भाष्य करणाऱ्या शहासने यांनी कोरोनावर अनेक कविता केल्या. त्या व्हाटसऍप व इतर सोशल माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचल्या. त्याचाच परिणाम काही हौशी गायकांनी या कविता ध्वनीमुद्रण करून पाठविल्या. त्यानंतर या कविता ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवून जागरण करावे असा विचार करून हा उपक्रम सुरु केल्याचे शहासने म्हणाले. या कवितांना हरिपाठ, हिंदी-मराठी गीतांच्या चाली लावून युट्युब, फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आधीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवले जात आहे.