Elgar conference will not be held in Pune on December 31; Police denied permission

महाविकास आघाडी सरकारने एल्गार परिषदेला परवानगी दिली आहे. सरकारच्या या परवानगीवर ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतला आहे. सरकारने एल्गार परिषदेला अचानक परवानगी दिलीच कशी? असा सवालच ब्राह्मण महासंघाने उपस्थित केला आहे.

पुणे : महाविकास आघाडी सरकारने एल्गार परिषदेला परवानगी दिली आहे. सरकारच्या या परवानगीवर ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतला आहे. सरकारने एल्गार परिषदेला अचानक परवानगी दिलीच कशी? असा सवालच ब्राह्मण महासंघाने उपस्थित केला आहे.

कायदा-सुव्यवस्थेचे कारण पुढे करत १ जानेवारीला एल्गार परिषदेला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, मागील अनेक दिवसांपासून माजी न्यायमूर्ती बी.जे. कोळसे पाटील एल्गार परिषदेला परवानगी मिळावी म्हणून प्रयत्न करत होते. यासाठी त्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता.

अखेर पुणे पोलिसांनी ही परवानगी दिलेली आहे. येत्या शनिवारी म्हणजेच ३० जानेवारीला स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे ही परिषद होणार आहे.

एका महिन्यात परिस्थितीत असा काय फरक पडला की, सरकारने एल्गार परिषदेला परवानगी दिली, असा सवाल ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी उपस्थित केलाय.