पुण्यात मद्याच्या घरपोच सेवेला परवानगी

पुणे : महाराष्ट्रातील अबकारी कर विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार पुण्यात मद्याच्या घरपोच सेवेला परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्रात नागपूर, कोल्हापूर आणि नाशिक या शहरांमध्येही घरपोच सेवेला परवानगी

पुणे : महाराष्ट्रातील अबकारी कर विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार पुण्यात मद्याच्या घरपोच सेवेला परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्रात नागपूर, कोल्हापूर आणि नाशिक या शहरांमध्येही घरपोच सेवेला परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने १२ मे रोजी जारी केलेल्या निर्देशानुसार लॉकडाऊनच्या काळात सोशल डिस्टंसिंग पाळले जावे आणि गर्दी टाळली जावी या दृष्टीने मद्याच्या घरपोच सेवेला परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या अबकारी विभागाच्या मुख्य सचिव वल्सा नायर सिंग म्हणाल्या, १५ मे पासून मद्याची घरपोच सेवा करता येईल, असे महाराष्ट्र सरकारने जाहीर केले आहे. या क्षेत्रात हा नाविन्यपूर्ण उपक्रम असल्याने सर्व संबंधितांकडून आम्हाला पूर्ण सहकार्याची अपेक्षा आहे. सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळत आपण हा उपक्रम राबवूया. या क्षेत्रातील व्यवसायात अधिक सुलभता आणण्याच्या दृष्टीने आम्ही विविध पर्याय धुंडाळत आहोत. सरकारने जारी केलेल्या या निर्देशानुसार, एका दुकान मालकाला १० हून अधिक डिलिव्हरी कर्मचारी नेमता येणार नाहीत आणि डिलिव्हरी करणारी एक व्यक्ती एका वेळेला २४ हून अधिक परवानाप्राप्त मद्याच्या बाटल्या घेऊन जाऊ शकणार नाही. ग्राहकांना दिलासा देत सरकारने, ग्राहकांकडून बाटलीवर छापलेल्या कमाल किमतीहून अधिक किंमत आकारू नये, असेही आदेश दुकान मालकांना दिले आहेत.