पिकं आणि जनावरं वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे.
पिकं आणि जनावरं वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे.

पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील कुरकुंभ परिसरात परतीचा पावसाने दाणादाण उडवून दिली आहे.  त्यामुळे जिरेगाव तलाव ओवर फ्लो होऊन त्याखाली मळद हद्दीतील तीन वर्षांपूर्वी  बांधलेला तलाव बुधवार दि.१४ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास फुटल्याने

कुरकुंभ:  तलाव फुटल्याने खालच्या बाजूस असणारे मळद, रावणगाव , नंदादेवी, खडकी आणि स्वामीचींचोली या गावात पूरपरिस्थिती निर्माण होऊन तडाखा बसला आहे

अचानक रात्री पूरपरिस्थिती ओढवल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने तारांबळ उडाली. काही ठिकाणचे रस्ते वाहून गेल्याने जनजीवन विस्कळीत होऊन काहींचा जनसंपर्क तुटला आहे. तर शेतातील उभी पिके वाहून जाऊन गेली आहे. वखारीत साठवलेला कांदा वाहून गेला.

काहींच्या गोठ्यातील गाई ,बैलं, म्हशी, शेळ्या, मेंढ्या वाहून गेल्या आहेत . त्यामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सरकारने मदत द्यावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

जिरेगाव तलाव ओवर ओवर फ्लो होऊन पाणी दौंड-बारामती रोडवर आल्याने आणि कुरकुंभ ओढ्याच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होऊन कुरकुंभ ओढ्याचेही पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक काही काळ बंद होती.