फलटण नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांचे निधन

    फलटण : फलटण नगरपरिषदेचे विद्यमान उपनगराध्यक्ष व उद्योजक नंदकुमार भोईटे (वय 60) यांचे शनिवारी निधन झाले. फलटण नगर परिषदेमध्ये 1991 पासून ते आज अखेरपर्यंत ते नगरसेवक होते.  लेह लद्दाख येथे फिरावयास गेले असताना त्यांचे हृदयविकाराने निधन झाले.

    यापूर्वी त्यांनी नगराध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते. विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा मोठा वाटा होता. जनतेशी असलेली नाळ त्यांनी शेवटपर्यंत जपली होती. दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जात होते. त्यांच्या निधनाची वार्ता रात्री उशिरा फलटण शहरात पसरताच अनेकांना धक्का बसला. त्यांच्या पश्चात भाऊ, पुतण्या असा परिवार आहे.