Phule couple's memorial to be set up in Pimpri village

पिंपरी गाव येथील आरक्षण क्र.१६२ मध्ये क्रिडांगण विकसित करण्याचे काम महापालिकेच्या वतीने सुरू आहे.सदर ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांचा ब्राँझ धातूचा अर्धपुतळा असलेले स्मारक उभारण्यात येणार आहे.

    पिंपरी: पिंपरी गाव येथील आरक्षण क्र.१६२ मध्ये क्रिडांगण विकसित करण्याचे काम महापालिकेच्या वतीने सुरू आहे.सदर ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांचा ब्राँझ धातूचा अर्धपुतळा असलेले स्मारक उभारण्यात येणार आहे.

    याबाबतीत अधिक माहिती देताना नगरसेवक संदीप वाघेरे म्हणारे की, पिंपरी गावामध्ये फुले दाम्पत्यांचे स्मारक व्हावे अशी ग्रामस्थांची मागणी होती त्यानुसार सदर विकसित होणार्‍या क्रीडांगणास ‘ग’क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत “ महात्मा ज्योतिबा फुले क्रिडा संकुल ” असे नामकरण करण्यात आले.

    तसेच नगरसेवक संदीप वाघेरे, सावता सेवक ट्रस्ट व पिंपरी वाघेरे ग्रामस्थ यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांचा ब्राँझ धातूचा अर्धपुतळा तयार करण्यात आला असून लवकर पुतळा सदर क्रिडा संकुल येथे बसविण्यात येणार आहे.सदरच्या पुतळा शिल्पकार सुप्रिया शिंदे यांनी केला असून कलासंचनालय मुंबई यांची मान्यता देखील देण्यात आली आहे.