शिक्रापुर चाकण रस्त्यावर पिकअप टेम्पो उलटला

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील चाकण शिक्रापूर रस्त्याचे कडेला शिक्रापूर हून चाकणच्या दिशेने चाललेला पिक अप टेम्पो अचानकपणे उलटून रस्त्याच्या खाली चारीत कोसळला असल्याची घटना घडली असून सुदैवाने कोणत्याही प्रकारची हानी यामध्ये झाली नसून येथील विद्युत खांबाचे नुकसान झाले आहे.

 सुदैवाने कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील चाकण शिक्रापूर रस्त्याचे कडेला शिक्रापूर हून चाकणच्या दिशेने चाललेला पिक अप टेम्पो अचानकपणे उलटून रस्त्याच्या खाली चारीत कोसळला असल्याची घटना घडली असून सुदैवाने कोणत्याही प्रकारची हानी यामध्ये झाली नसून येथील विद्युत खांबाचे नुकसान झाले आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील चाकण शिक्रापूर रस्त्याने एम एच १२ पि क्यू ५८४४ हा पिकअप टेम्पो शिक्रापूर दिशेने चाकण कडे जात असताना अचानकपणे रस्त्याच्या बाजूला असलेल्या चारीतून खाली कोसळला यावेळी येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबाला टेम्पो आदळला जाऊन विद्युत खांबाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही हानी झालेली नाही. सदर टेम्पोचा चालक किरकोळ प्रमाणात जखमी झाला आहे. याबाबत विद्युत वितरण विभागाचे कर्मचारी इंद्रजीत खरसाडे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विद्युत खांबाचे नुकसान झाल्याबाबत सदर पिकअप टेम्पोच्या अज्ञात चालकावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.