महापालिका निवडणूकीसाठी शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येणार? संजय राऊत यांचे महत्त्वाचे विधान; काँग्रेस एकटीच पडणार?

भाजपा विरोधात महाविकास आघाडी कशा पद्धतीने या निवडणुका लढेल, याबद्दल त्यांनी आज सूतोवाच केलं. आगामी पुणे महापालिका निवडणूक एकत्र लढायची हे सूत्र ठरलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र राहतील. त्यात काँग्रेसला कसं सामावून घ्यायचं, त्या बद्दल चर्चा करु आणि ज्या शहरात, ज्या पक्षाची ताकद आहे, त्यांनी पुढाकार घ्यावा, असे संजय राऊत म्हणाले.

    राज्यातील आगामी वर्षात होणाऱ्या महापालिका निवडणुकांसंदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असून काँग्रेसला कसं सामावून घ्यायचं, त्या बद्दल चर्चा करू, असं वक्तव्य संजय राऊत यांनी पुण्यात केलं आहे.

    भाजपा विरोधात महाविकास आघाडी कशा पद्धतीने या निवडणुका लढेल, याबद्दल त्यांनी आज सूतोवाच केलं. आगामी पुणे महापालिका निवडणूक एकत्र लढायची हे सूत्र ठरलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र राहतील. त्यात काँग्रेसला कसं सामावून घ्यायचं, त्या बद्दल चर्चा करु आणि ज्या शहरात, ज्या पक्षाची ताकद आहे, त्यांनी पुढाकार घ्यावा, असे संजय राऊत म्हणाले.

    पुणे, पिंपरी- चिंचवड अशा काही महापालिका आहेत, जिथे राष्ट्रवादीची ताकद शिवसेनेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे तिथे पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणुका एकत्र कशा लढायच्या, याबद्दल अजित पवारांबरोबर चर्चा करु, असे संजय राऊत म्हणाले. परंतु काँग्रेस पुन्हा एकदा एकटीच पडणार असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे मुंबई-पुणे महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसलाही समावून घेणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.