पिंपरी – चिंचवड अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांची ठाण्यात बदली 

पिंपरी - चिंचवड पोलीस आयुक्तालय, मुख्यालय येथे कार्यरत असलेले पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्याकडे मुख्यालय, प्रशासन, वाहतुक तसेच गुन्हे शाखेची जबाबदारी होती. पोलीस उपमहानिरीक्षक या पदावर त्यांना बढती देण्यात आली आहे.

    पिंपरी: पिंपरी – चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांची ठाणे शहर येथे बदली झाली. तर, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांना पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून बढती मिळाली असून त्यांची गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे बदली झाली आहे. तसेच पुणे शहर पोलीस दलातील संजय शिंदे यांची पिंपरी – चिंचवडच्या अपर आयुक्तपदी बदली झाली आहे.

    राज्याच्या गृह विभागाने राज्यातील पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाच्या पदावर भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बढती व बदलीचे आदेश दिले आहेत. यामध्ये १६ अधिकाऱ्याच्या बदल्या आहेत. त्यामध्ये पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत असलेल्या तीन अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली आहे. पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालय, मुख्यालय येथे कार्यरत असलेले पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्याकडे मुख्यालय, प्रशासन, वाहतुक तसेच गुन्हे शाखेची जबाबदारी होती. पोलीस उपमहानिरीक्षक या पदावर त्यांना बढती देण्यात आली आहे. गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे त्यांची बदली करण्यात आली आहे.

    पिंपरी – चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांची ठाणे शहर, पश्चिम विभागाचे अपर पोलीस आयुक्त म्हणून बदली केली आहे. त्यांच्या जागी पुणे शहर, दक्षिण विभागाचे अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांची बदली झाली आहे. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे हे पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सुरुवातीपासून शहरात कार्यरत होते.