पिंपरी – चिंचवड शहरातील ऑटो क्लस्टर कोविड रुग्णालय बंद

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना बाधित रुग्णांना तातडीने वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने सर्व सोयींनी सुसज्ज अशी यंत्रणा ऑटो क्लस्टरमध्ये उभारलेली आहे. शहरात फेब्रुवारी २१ पासून पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली होती. दिवसाची रुग्णसंख्या तीन हजारापर्यंत गेली होती. मे महिन्याच्या पंधरवड्यापासून शहरातील रुग्णसंख्येत घट होत आहे. रुग्णसंख्या पाचशेच्या आतमध्ये आली आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या बाधित रुग्णांची संख्या देखील खूप कमी झाली आहे. सद्यस्थितीमध्ये ऑटो क्लस्टर कोविड रुग्णालयामध्ये एकही रुग्ण नाही.

    पिंपरी: पिंपरी – चिंचवड शहरातील कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेतील कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या बाधित रुग्णांची संख्या देखील खूप कमी झाली आहे. सद्यपरीस्थितीमध्ये ऑटो क्लस्टर कोविड रुग्णालयामध्ये एकही रुग्ण नाही. त्यामुळे रुग्णसंख्ये अभावी ऑटो क्लस्टर कोविड रुग्णालय बंद करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी काढला आहे.

    कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना बाधित रुग्णांना तातडीने वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने सर्व सोयींनी सुसज्ज अशी यंत्रणा ऑटो क्लस्टरमध्ये उभारलेली आहे. शहरात फेब्रुवारी २१ पासून पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली होती. दिवसाची रुग्णसंख्या तीन हजारापर्यंत गेली होती. मे महिन्याच्या पंधरवड्यापासून शहरातील रुग्णसंख्येत घट होत आहे. रुग्णसंख्या पाचशेच्या आतमध्ये आली आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या बाधित रुग्णांची संख्या देखील खूप कमी झाली आहे. सद्यस्थितीमध्ये ऑटो क्लस्टर कोविड रुग्णालयामध्ये एकही रुग्ण नाही. रुग्णसंख्येअभावी ऑटो क्लस्टर कोविड रुग्णालय तातडीने बंद करणे आवश्यक आहे.

    त्यामुळे महापालिकेने ऑटो क्लस्टर कोविड रुग्णालय आजपासून बंद केले आहे. या रुग्णालयासाठी फॉच्र्युन स्पर्श या खासगी संस्थेचे ९ मे रोजी अधिग्रहित करण्यात आलेले सर्व कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. या रुग्णालयात कार्यरत असलेले महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी पुढील आदेशापर्यंत कार्यालयीन कामकाज करण्याबाबत रुग्णालयात कार्यरत रहावे, असे आयुक्त पाटील यांनी आदेशात म्हटले आहे. दरम्यान, रुग्णसंख्या घटल्याने महापालिकेने पाच कोविड केअर सेंटर (सीसीसी) या पूर्वीच बंद केले आहेत. तर, नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे १०० रुग्ण उपचार घेत असून नवीन रुग्ण दाखल करून घेणे बंद केले आहे. १० तारखेपर्यंत बंद जम्बो सेंटर बंद होईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.