पिंपरी-चिंचवडच्या भाजप नगरसेविका अर्चना बारणे यांचा डेंग्यूमुळे मृत्यू

अर्चना बारणे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २३, शिवतीर्थनगर, समर्थनगर, केशवनगरमधून नगरसेवक झाल्या होत्या. त्यांनी स्थायी समितीचे सदस्यत्व आणि ‘ग’ प्रभाग कार्यालयाचे अध्यक्षपदही भूषवले होते.

    पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवडमधील भाजप नगरसेविका अर्चना तानाजी बारणे(Archana Barne) यांचा मंगळवारी रात्री डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्यावर पिंपरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

    अर्चना बारणे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २३, शिवतीर्थनगर, समर्थनगर, केशवनगरमधून नगरसेवक झाल्या होत्या. त्यांनी स्थायी समितीचे सदस्यत्व आणि ‘ग’ प्रभाग कार्यालयाचे अध्यक्षपदही भूषवले होते.कोरोना काळात अत्यंत सक्रिय राहून प्रभागात मदत कार्य पोहचवले होते.

    त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना नगरसेविकेच्याच जीवावर बेतल्याने पालिका प्रशासनाच्या हलगर्जीवरही बोट ठेवले जात आहे.बी त्यांच्या पश्चात पती, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.