वाढत्या कोरोना रुग्णांमुळे पिंपरी-चिंचवड आयुक्तांनी घेतला ‘हा’ निर्णय

गर्दीच्या ठिकाणी काही निर्बंध आणता येतील का यासंबंधी काही पावलं उचलली जाणार आहेत. करोना चाचण्या वाढवण्यात येणार आहेत. अगोदर २००० चाचण्या होत होत्या त्या वाढवून ३००० करणार आहोत. नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर वापरावे तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे- राजेश पाटील यांनी केले आहे.

    गेल्या चार दिवसामध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे स्पष्ट झालेले आहे.  शहरात चार दिवसांमध्ये जवळपास एक हजार बाधित रुग्णांची नोंद झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील बंद करण्यात आलेले जम्बो कोविड आणि इतर कोविड सेंटर टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असून आरोग्य कर्मचाऱ्यांना पुन्हा रुजू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली आहे.

    ‘गर्दीच्या ठिकाणी काही निर्बंध आणता येतील का यासंबंधी काही पावलं उचलली जाणार आहेत. करोना चाचण्या वाढवण्यात येणार आहेत. अगोदर २००० चाचण्या होत होत्या त्या वाढवून ३००० करणार आहोत’.’नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर वापरावे तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे,’ असं आवाहन राजेश पाटील यांनी केले आहे.  नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. महानगरपालिका आणि राज्य प्रशासनाला कोविडचे सर्व नियम पाळून सहकार्य करावे. पुढील सात दिवस नागरिकांनी सहकार्य केल्यास लॉकडाऊन ची परिस्थती उद्भवणार नाही.