पिंपरी – चिंचवड महापालिकेने लसीकरणात १६ लाखांचा टप्पा ओलांडला

१६ जानेवारी २१ पासून शहरात लसीकरणास सुरुवात झाली. २३ मार्चला एक लाखाचा टप्पा पूर्ण झाला. त्यानंतर ६ एप्रिल ते ३ ऑगस्टपर्यंत ११ लाखांचा लसीकरणाचा टप्पा पूर्ण झाला. ४ ऑगस्ट रोजी १२ लाख ,३ सप्टेंबर रोजी १५ लाख आणि १० सप्टेंबररोजी १६ लाखांचा लसीकरणाचा टप्पा ओलांडण्यात आला आहे. यामध्ये आरोग्य सेवेत असलेले ५७ हजार ८२६ आणि फ्रंन्टलाइन वर्कर असलेले ८१ हजार ८२३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

    पिंपरी –  पिंपरी – चिंचवड महापालिकेने शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा १६ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. शहरातील साडेअकरा लाख नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर, साडेचार लाख नागरिकांनी दुसरा डोस घेवून लसीकरण पूर्ण केले आहे. महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे यांनी ही माहिती दिली.

    १६ जानेवारी २१ पासून शहरात लसीकरणास सुरुवात झाली. २३ मार्चला एक लाखाचा टप्पा पूर्ण झाला. त्यानंतर ६ एप्रिल ते ३ ऑगस्टपर्यंत ११ लाखांचा लसीकरणाचा टप्पा पूर्ण झाला. ४ ऑगस्ट रोजी १२ लाख ,३ सप्टेंबर रोजी १५ लाख आणि १० सप्टेंबररोजी १६ लाखांचा लसीकरणाचा टप्पा ओलांडण्यात आला आहे. यामध्ये आरोग्य सेवेत असलेले ५७ हजार ८२६ आणि फ्रंन्टलाइन वर्कर असलेले ८१ हजार ८२३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

    १८ ते ४४ वयोगटातील ७ लाख ८८ हजार, ४५ ते ६० वयोगटातील ४ लाख , ६० वर्षापुढील २ लाख ६१ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. महापालिकेच्या ६९ आणि खासगी १३२ लसीकरण केंद्र असे मिळून २०१ लसीकरण केंद्रावर हे लसीकरण पूर्ण करण्यात आले.