पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयात नवीन २१ पोलीस निरीक्षक

२१ पोलीस निरीक्षक बदली होऊन पिंपरी - चिंचवडमध्ये आले आहेत. तर, पिंपरी - चिंचवड पोलीस आयुक्तालयातील नऊ पोलीस निरीक्षक बदली होऊन बाहेर गेले आहेत.

    पिंपरी: राज्यातील १२३ पोलीस निरीक्षकांच्या विनंती आणि २९४ पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये २१ पोलीस निरीक्षक बदली होऊन पिंपरी – चिंचवडमध्ये आले आहेत. तर, पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयातील नऊ पोलीस निरीक्षक बदली होऊन बाहेर गेले आहेत.

    पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयात आलेले नवीन पोलीस निरीक्षक

    रावसाहेब जाधव (पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज), विजया करांदे (पुणे शहर), मनोज खंडाळे (लोहमार्ग पुणे), दिलीप शिंदे (पुणे शहर), दिपाली धाडगे (पुणे शहर), मच्छिंद्र पंडीत (पुणे शहर), दीपक साळुंखे (पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज), नितीन लांडगे (गुन्हे अन्वेषण विभाग), रूपाली बोबडे (पोलीस प्रशिक्षण केंद्र , अकोला), राजेंद्र बर्गे (गुन्हे अन्वेषण विभाग), वर्षाराणी पाटील (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), किशोर पाटील (पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर), रामचंद्र घाडगे (नवी मुंबई), शंकर दामसे (पुणे शहर), रणजित सांवत (पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज), ज्ञानेश्वर काटकर (लोहमार्ग, मुंबई), सत्यवान माने (नागपूर शहर), मधुकर सावंत (संभाजीनगर शहर), रमेश पाटील (गुन्हे अन्वेषण विभाग), सुनील तांबे (पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना), चंद्रकांत भोसले (मिरा-भाईंदर

    पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयातून बदली होऊन बाहेर गेलेले पोलीस निरीक्षक
    अमरनाथ वाघमोडे (पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज), अजय भोसले (नवी मुंबई), सुनील पिंजण (गुन्हे अन्वेषण विभाग), दिलीप भोसले (मुंबई), किशोर म्हसवडे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), सुधीर अस्पत (राज्य गुप्तवार्ता विभाग), सुधाकर काटे (गुन्हे अन्वेषण विभाग), विलास सोंडे (पुणे शहर), रंगनाथ उंडे (पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज).