पिंपरी-चिंचवड पोलिसांनी उभारले १३ चेकपोस्ट ; वाहनांची होतेय तपासणी,पण ई-पासबद्दल विचारणाच नाही

पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या १३ रस्त्यांवर चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. तसेच अंतर्गत नाकाबंदी देखील आहे. वाहनचालकांची कसून तपासणी केली जात आहे. मात्र ही तपासणी करताना चेकपोस्टवर ई- पासबाबत विचारणा केली जात नाही.

    पिंपरी: वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्हाबंदी करण्यात आली आहे. मात्र तरीही नागरिकांचे प्रवास करण्याचे प्रमाण मोठे आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या १३ रस्त्यांवर चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. तसेच अंतर्गत नाकाबंदी देखील आहे. वाहनचालकांची कसून तपासणी केली जात आहे. मात्र ही तपासणी करताना चेकपोस्टवर ई- पासबाबत विचारणा केली जात नाही. अनेक ठिकाणी पोलिसांनी वाहनचालकांना पकडले असता रक्तदान करायचेआहे. औषधे घ्यायला जातोय, अशी विविध कारणे वाहनचालकांकडून सांगितली जातात. सांगवी येथे नाकाबंदीत एका चारचाकी वाहनाला अडवले. आम्ही प्लाझ्मा घेऊन जातोयअसे सांगितले जात आहे.

    अंतर्गत भागातील नाकाबंदीची ३६ ठिकाणे तसेच १३ चेकपोस्ट अशा ४९ ठिकाणी बंदाेबस्त आहे. प्रत्येक पॉईंटसाठी एक अधिकारी, वाहतूक विभागाचे चार व स्थानिक पोलीस ठाण्यांकडीत दोन कर्मचारी अशा सात जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानुसार ४९ अधिकारी व २९४ कर्मचारी अशा एकूण ३४३ पोलिसांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.