डॉ. रोहन काटे आणि डॉ. विनायक पाटील यांना पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार जाहीर

    पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराचे दिवंगत महापौर कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ३५ व्या स्मृतीदिनानिमित्त पिंपरी चिंचवड समाजभूषण पुरस्कार प्रदान समारंभ आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांनी प्रसिद्धीस दिली.

    रविवारी (दि. ६ जून) पिंपरी गावातील कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या पुतळ्यास सकाळी ९ वाजता महापौर माई ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात येईल. सकाळी साडेनऊ वाजता नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या मैदानात रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन होईल. यानंतर डॉ. रोहन काटे आणि डॉ. विनायक पाटील यांना पिंपरी चिंचवड समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल.