पिंपरी महापालिका क्रीडा संकुले, स्पर्धा परीक्षा केंद्र सोमवारपासून सुरु राहणार

इनडोअर  स्पोटर्सकरिता खेळाडू आणि कर्मचाऱ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण (दोन डोस) झालेले असणे बंधनकारक आहे. १८ वर्षाखालील खेळाडुसाठी योग्य खबरदारीने फक्त ट्रेनिंग सुरु ठेवता येईल.

    पिंपरी: पिंपरी – चिंचवड शहरातील मैदाने, क्रीडा संकुले, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सोमवारपासून सुरु राहणार आहेत. याचा लाभ घेण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचे सुधारित आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी शनिवारी पारित केले आहेत.

    महापालिका क्षेत्रातील सर्व आउटडोअर स्पोटर्स आणि इनडोअर स्पोटर्स सोमवारपासून आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. मात्र, इनडोअर  स्पोटर्सकरिता खेळाडू आणि कर्मचाऱ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण (दोन डोस) झालेले असणे बंधनकारक आहे. १८ वर्षाखालील खेळाडुसाठी योग्य खबरदारीने फक्त ट्रेनिंग सुरु ठेवता येईल. शहरातील स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र, कोचिंग क्लासेस ५० टक्के क्षमतेने सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी यांचे लसीकरण (किमान प्रथम डोस) घेतलेला असणे बंधनकारक असल्याचे आदेशात स्पष्ट म्हटले आहे.