पिरंगुट दुर्घटना : कंपनी मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

कामगार राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी कामगारांचे नातेवाईक तसेच स्थानिकांनी कंपनीच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेत स्थानिक प्रशासन व पोलिस यांनी दिवसभर कंपनीमालक शहा यांची कसून चाैकशी केली. यानंतर संध्याकाळी उशीरा पाैड पोलिसांनी शहा यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. शहा यांची चोकशी शुरू असतांना त्यांचे नातेवाईल पिरंगुट पोलिस चौकीत उपस्थित होते.

    पुणे : पिरंगुट औद्योगिक वसाहतीमधील केमिकल कंपनीत लागलेल्या भीषण आगीत १८ कामगारांच्या होरपळून मृत्यू झाला. काहींच्या नजरेत ही एक केवळ भीषण दुर्घटना होती, तर काहीजणांसाठी ही दुर्घटना म्हणजे आभाळ कोसळण्यासारखीच ठरली. या घटनेत कुणी आई गमावली, तर कुणी बाप… कुणाची बहीण गेली… तर कुणाच्यातरी मुलाला काळाने हिरावून घेतलं.एसव्हीए ॲक्वा कंपनीला केवळ क्लोरोक्विनचा गोळ्यांच्या पँकींगची आणि पावडर तयार करण्याची परवानगी होती. फक्त याचाच परवाना असतांना सॅनिटायझर प्लॅस्टिक बॉटलमध्ये भरण्याचे काम मालकाने या ठिकाणी सुरू केले होते. हे अतिशय धोकादायक रसायन असल्यामुळेच या ठिकाणी ही मोठी घटना घडली आणि त्यात अनेकांना जिव गमवावा लागला. याप्रकरणी कंपनी मालक निकुंज शहा याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मृतांच्या कुटुंबीयांनी केली. दरम्यान, निकुंज शहा याची पौड पोलिस चौकशी करत असून त्याच्यावर सायंकाळी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे पाटील यांनी दिली.

    पुण्यातील पिरंगुट येथील केमिकल कंपनीत लागलेली आग १८ कुटुंबासाठी दुःखाचा डोंगर कोसळल्यासारखी ठरली…! मृत्यू झालेल्या या जीवांची होरपळ मृत्यूनंतरही थांबलेली नाही. मृतदेहांची ओळख देखील नातेवाइकांना पटेना, त्यामुळे आता कामावर जाताना कोणते कपडे किंवा दागिने घातले होते या माहितीच्या आधारावरच मृतदेहांची ओळख समजू शकणार आहे. या भीषण दुर्घटनेमुळे पिरंगुट परिसरावर शोककळा पसरली आहे.