प्लास्टिक कचरा, ई – करणाऱ्या होणार प्रक्रिया ; पिंपरी महापालिकेचा ‘ईसीए’सोबत सामंजस्य करार

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पिंपरी - चिंचवड महापालिकेतर्फे 'ईसीए' ला भोसरी कचरा स्थानांतरण केंद्राशेजारी जागा देण्यात आली आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील आणि ईसीए अध्यक्षा विनीता दाते यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. ईसीएचे विश्वस्त तसेच जेष्ठ पर्यावरणतज्ज्ञ नितीन देशपांडे यांची याकरिता समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

    पिंपरी :  प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाबरोबरच ई – कचऱ्याची मोठी समस्या सध्या सर्वांना भेडसावत आहे. या ई कचऱ्याचे संकलन, त्यावर पुनप्र्रक्रिया करून होणारा वापर आणि व्यापक जनजागृतीसाठी जिकिरीचे बनले आहे. यासाठी पर्यावरण संवर्धन असोसिएशन (ईसीए) या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला आहे. ई कचNयावर आधारित विविध उपक्रम राबविण्याबरोबरच प्लास्टिक कचरा व्यवस्थापन करण्यासाठी नुकताच पिंपरी महापालिका आणि ईसीएमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे.

    कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पिंपरी – चिंचवड महापालिकेतर्फे ‘ईसीए’ ला भोसरी कचरा स्थानांतरण केंद्राशेजारी जागा देण्यात आली आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील आणि ईसीए अध्यक्षा विनीता दाते यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. ईसीएचे विश्वस्त तसेच जेष्ठ पर्यावरणतज्ज्ञ नितीन देशपांडे यांची याकरिता समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी महापालिका, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळ, आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहकार्य मिळाले आहे. ईसीएबरोबरच पिंपरी – चिंचवड प्लास्टिक असोसिएशन, ई वेस्ट ग्लोबल या संस्था सहभागी होणार आहेत.

    या प्रकल्पाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ई कचऱ्याचे संकलन, पुनर्वापर अणि जनजागृतीपर उपक्रम राबविले जाणार आहेत. तसेच हॉबी सेंटरच्या माध्यमातून पर्यावरण जनजागृती कार्यक्रम, प्रशिक्षण, व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री केली जाणार आहे. त्याचप्रमाणे बायोगॅस निर्मिती, कंपोस्टींग, सौर उर्जा उपकरणे, प्लास्टीकपासून इंधन निर्मिती असे पथदर्शी प्रात्याक्षिके दाखविण्यात येणार आहेत. पावसाच्या पाण्याचे पुनर्नियोजनाबरोबरच सौर उर्जेवर चालणाऱ्या अनेक गोष्टींच्या वापराद्वारे इमारत बांधण्यात येणार आहे. संपुर्ण परिसर पर्यावरणपूरक व हरित असण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, पर्यावरणतज्ज्ञ आणि पर्यावरण प्रेमींसाठी हा प्रकल्प पर्वणी ठरणारा आहे.

    ई - कचऱ्याचे विघटन आणि पुनर्वापर याबाबत विद्यार्थी आणि नागरिकांना लघूपटाच्या माध्यमातून माहिती दिली जाणार आहे. तसेच शाळांना या केंद्रात भेट घडवून ई कचऱ्याविषयी जागृत केले जाणार आहे. संशोधन आणि मार्गदर्शनासाठी विशेष सहाय्य केले जाणार आहे. आम्ही पिंपरी - चिंचवड महापालिकेसोबत १५ वर्षासाठी करार केला आहे. ई - कचऱ्याचे कलेक्शन सेंटर भोसरी एमआयडीसी परिसरात उभारण्यात आले आहे.'

    -नितीन देशपांडे, समन्वयक व विश्वस्त, ईसीए