महाराष्ट्रातील खेळाडू देशासाठी पदक जिंकून परत येतील; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला विश्वास

भारतीय ऑलिम्पिक संघाला यशासाठी शुभेच्छा देताना, ऑलिम्पिक पदक जिंकून देणारे खेळाडू महाराष्ट्रात मोठ्या संख्येने तयार होण्यासाठी राज्याच्या शहरात, गावखेड्यात, वाडीवस्तीवर क्रीडासंस्कृती रुजवण्याचे आवाहनही त्यांनी केले. जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनतर्फे डेक्कन जिमखाना-पुणे येथे ‘ऑलिम्पिक डे 2021’ कार्यक्रमाचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते.

    पुणे : टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधीत्व करणारे महाराष्ट्रातील खेळाडू देशासाठी पदक जिंकून परत येतील, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

    भारतीय ऑलिम्पिक संघाला यशासाठी शुभेच्छा देताना, ऑलिम्पिक पदक जिंकून देणारे खेळाडू महाराष्ट्रात मोठ्या संख्येने तयार होण्यासाठी राज्याच्या शहरात, गावखेड्यात, वाडीवस्तीवर क्रीडासंस्कृती रुजवण्याचे आवाहनही त्यांनी केले. जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनतर्फे डेक्कन जिमखाना-पुणे येथे ‘ऑलिम्पिक डे 2021’ कार्यक्रमाचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते.

    या कार्यक्रमाला पवार ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. टोक्यो ऑलिंपिकसाठी निवड झालेल्या राही सरनोबत (नेमबाजी), तेजस्विनी सावंत (नेमबाजी), प्रविण जाधव (तिरंदाजी), अविनाश साबळे (अॅथलेटिक्स), चिराग शेट्टी (बॅडमिंटन), स्वरुप उन्हाळकर (पॅरा शुटींग), सुयश जाधव (पॅरा जलतरण) यांच्यासह माजी ऑलिंपिक खेळाडूंचाही यावेळी ऑनलाईन सत्कार करण्यात आला.