इंधन दरवाढीचा फटका ! पीएमपीचा बस सीएनजीमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय ; ५ बस प्रायोगिक तत्वावर रुपांतरीत करण्यात येणार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकानंतर 'पीएमपी'ने तीन एप्रिलपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी बस सेवा बंद केली होती. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी काही मार्गावर बस सेवा सुरू ठेवली होती. कोरोनाचा आलेख कमी झाल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यापासून दोन्ही शहरांतील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले. त्यामुळे 'पीएमपी'ने सहा जूनपासून २५ टक्के बस निम्म्या प्रवासी क्षमतेसह सर्वसामान्यांसाठी सुरू केल्या.

    पुणे : इंधनांच्या वाढत्या दरांचा फटका आता पुण्यातल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला देखील बसला आहे. प्रदूषण आणि खर्च कमी करण्यासाठी पीएमपीएमएल ने आता डिझेल बसेसचे रूपांतर सीएनजी बसेस मध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे.

    गेल्या काही दिवसांमध्ये पुणे महानगर परिवर्तन महामंडळाला आर्थिक फटका बसला आहे. लॉकडाऊन मध्ये बस बंद असल्याने आणि नंतर फक्त अत्यावश्यक सेवेसाठी सुरू ठेवल्याने पीएमीएमएलचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता पीएमीएमएलच्या एकुण २३३ बसेस या आता सीएनजी बसेस मध्ये रुपांतरीत करण्यात येणार आहेत. सुरुवातीला यासाठी ५ बस प्रायोगिक तत्वावर रुपांतरीत करण्यात येणार आहेत. यानंतर इतर बस देखील बदलल्या जातील.याविषयी बोलताना पीएमीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थपकीय संचालक राजेंद्र जगताप म्हणाले “सीएनजी बसेस मुळे प्रदूषण कमी होणार आहे.तसेच बस चा इंजिन चे आयुष्य देखील वाढेल. त्याच बरोबर एकुण खर्च देखील कमी होईल. तसेच यासाठीचा खर्च वर्षभराचा आताच वसूल होईल.”

    -पीएमपी बसच्या संख्येत आजपासून वाढ
    पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतेक सर्व मार्गांवर सोमवारपासून (१४ जून) ४० टक्के बसगाड्या निम्म्या प्रवासी क्षमतेसह सोडण्यात येणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव घटल्याने आणि निर्बंध शिथिल झाल्याने प्रवाशांच्या सेवेत धावणाऱ्या बसगाड्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय ‘पीएमपी’ने घेतला आहे. दोन्ही शहरांतील १३ आगारांतून २५५ बसमार्गांवर ६५५ बसगाड्या आणण्याचे नियोजन ‘पीएमपी’ने केले आहे.

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकानंतर ‘पीएमपी’ने तीन एप्रिलपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी बस सेवा बंद केली होती. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी काही मार्गावर बस सेवा सुरू ठेवली होती. कोरोनाचा आलेख कमी झाल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यापासून दोन्ही शहरांतील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले. त्यामुळे ‘पीएमपी’ने सहा जूनपासून २५ टक्के बस निम्म्या प्रवासी क्षमतेसह सर्वसामान्यांसाठी सुरू केल्या. गेल्या आठवड्यापासून करोनाचा कहर आणखी नियंत्रणात आल्याने दोन्ही शहरांतील निर्बंध सोमवारपासून आणखी शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; तसेच प्रवाशांकडून सर्व मार्गांवरच्या बसची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘पीएमपी’ने प्रवाशांच्या सेवेतील बसगाड्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांनी मास्क वापरणे, सुरक्षित अंतराचे पालन करणे बंधनकारक असून, विनामास्क बसमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असे पीएमपी प्रशासनातर्फे सांगण्यात आले.