पीएमपीएमएलच्या ई-बस चार्जिंगसाठी महावितरणला ९८ लाख देणार

या ठिकाणी महावितरण वंâपनीकडील तीन हजार केव्हीए क्षमतेचे चार्जिंग स्टेशन उभारण्याबाबत अंदाजपत्रक सादर केले आहे. या कामासाठी २ पेâब्रुवारी २०२१ रोजी पीएमपीएमएलच्या प्रतिनिधीसमवेत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात आली. त्याबाबत पिंपरी - चिंचवड महापालिका विद्युत विषयक कामांसाठी वापरत असलेल्या दरसुचीप्रमाणे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.

    पिंपरी : हिंजवडी टप्पा दोनमध्ये पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ई-बस चार्जिंग करण्यासाठी आवश्यक असणारी विद्युत यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यासाठी वीज महावितरण वंâपनीच्या दरपत्रकाप्रमाणे काम करून मिळण्याबाबत पीएमपीएमएलचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक यांनी २६ ऑक्टोबर २०२० रोजीच्या पत्राद्वारे कळविले आहे.

    या ठिकाणी महावितरण वंâपनीकडील तीन हजार केव्हीए क्षमतेचे चार्जिंग स्टेशन उभारण्याबाबत अंदाजपत्रक सादर केले आहे. या कामासाठी २ पेâब्रुवारी २०२१ रोजी पीएमपीएमएलच्या प्रतिनिधीसमवेत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात आली. त्याबाबत पिंपरी – चिंचवड महापालिका विद्युत विषयक कामांसाठी वापरत असलेल्या दरसुचीप्रमाणे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.

    या कामासाठी एक कोटी रूपये इतका खर्च अपेक्षित आहे. या एक कोटी रूपये इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता मिळावी तसेच महावितरण वंâपनीकडील दरपत्रकाप्रमाणे या ठिकाणी उच्चदाब ग्राहक होण्यासाठी वीज महावितरण वंâपनीस ९८ लाख रूपये देण्यात येणार आहेत.