पोलिसांचा वॉकीटॉकीच घेऊन केला पोबारा

पिंपरी : मास्क न लावता कार चालवत असलेल्या चालकाला वाहतूक पोलिसांनी कार बाजूला घेण्यास सांगितले. हे सांगत असताना पोलिसांचा वॉकीटॉकी कारमध्ये पडला. चालकाने कार न थांबवता तसेच वॉकीटॉकी परत न करता तिघून पोबारा केला. ही घटना बुधवारी (दि. २) दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास शिवार चौक, रहाटणी येथे घडली.

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय व्यंकटेश कामटे (वय ५३) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनोळखी कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बुधवारी दुपारी शिवार चौक, राहाटणी येथे वाहतूक नियमनाचे काम करत होते. दरम्यान पोलीस विनामास्क वाहनचालकांवर कारवाई देखील करत होते. अनोळखी कार चालक तिथे आला. त्याने मास्क घातलेला नसल्याने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कामटे यांनी चालकाला वॉकीटॉकीच्या एरियलच्या साहाय्याने कार बाजूला घेण्यास सांगितले.

हे सांगत असताना कामटे यांच्याकडून त्यांच्याकडील १७ हजार ७२९ रुपये किमतीचा वॉकीटॉकी कारमध्ये पडला. कार बाजूला न घेता अनोळखी चालकाने पोलिसांचा वॉकीटॉकी घेऊन कारमधून पळ काढला. याबाबत कार चालकावर सरकारी कामात अडथळा आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.