कोरोना निर्बंध धाब्यावर बसवत विना मास फिरणाऱ्या नागरिकांवर पोलसांची कारवाई

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३३६ नागरिकांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई केली आहे. या नागरिकांकडून पोलिसांनी दंड आकाराला आहे.

    पिंपरी: कोरोनाची रुग्णसंख्या वेगवाने वाढत असली तरी अनेक नागरिक अजूनही बेफिकीरीने वागताना दिसत आहेत. प्रशासनाडून कोरोनाचे निर्बंध कडक करण्यात आले आहेत. मात्र त्याच्याकडेही नागरिक दुर्लक्ष करत आहेत. शहरात विना मास्क फिरत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३३६ नागरिकांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई केली आहे. या नागरिकांकडून पोलिसांनी दंड आकाराला आहे.

    शहरात रविवारापर्यंत ३ हजार ३८२ रुग्ण आढळले असून १ हजार ७९१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १६ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही वाढत आहे. एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १ लाख २६ हजार ६३६ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ५० हजार ९२८ वर गेली आहे. कोरोनामुळे मृत होणाऱ्यांची संख्या २ हजार ०६५ वर पोहोचली आहे.