विना मास्क धुळवड साजऱ्या करणाऱ्या पितापुत्रांवर पोलिसांची कारवाई

दोघेही आरोपी सार्वजनीक रस्त्यावर स्पीकर लावून सोशल डिस्टंस न पाळता तसेच मास्क न लावता नाच करत होते. त्यांना फिर्यादी काळे यांनी येथे गोंधळ घालू नका असे समजावून सांगितले. मात्र दोघांनीही त्यांना शिवीगाळ करत धक्का-बुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

    पुणे: कोरोनाचे वाढत्या रुग्णसंख्येमुळे दिवसेंदिवस कोरोनावरील निर्बंध कडक केले जात आहेत . मात्र नागरिकांकडून नियमांना हरताळ फासण्याचे काम केले जात आहे. पुण्यात नुकतेच मास्क न लवता धुळवड साजरी करत असताना रोखल्याने पोलीस कर्मचाऱ्यास धक्का-बुक्की करण्यात आली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी वडिल व मुलाला अटक केली आहे. ही घटना कात्रज येथील सच्चाईमाता मंदिराजवळील पाण्याच्या टाकीजवळ सार्वजनीक रस्त्यावर घडली.

    पोलीस अंमलदार गणेश काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संदिप सोमनाथ भोवते(४५) व सागर संदिप भोवते(१९) यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दोघेही आरोपी सार्वजनीक रस्त्यावर स्पीकर लावून सोशल डिस्टंस न पाळता तसेच मास्क न लावता नाच करत होते. त्यांना फिर्यादी काळे यांनी येथे गोंधळ घालू नका असे समजावून सांगितले. मात्र दोघांनीही त्यांना शिवीगाळ करत धक्का-बुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक म्हेत्रे करत आहेत.