पोलीस आयुक्तांनीही केली नागरिकांसोबत कोरोना चाचणी

पोलीस आयुक्तांनी मंडईमध्ये फेरफटका मारून विक्रेत्यांशी संवाद साधला. कोरोना साथीचा प्रदूर्भाव कमी करण्यासाठी खबरदारी घेण्याचे तसेच शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिास आयुक्तांनी केले.

     

     

    पिंपरी : पिंपरी कॅम्प परिसरातील नागरिकांसाठी पिंपरी पोलिसांच्या वतीने कोरोना रॅपिड अँटिजेन टेस्ट शिबिर घेण्यात आले. या शिबिरात भाजी विक्रेते, हमाल, कामगारांच्या टेस्ट करण्यात आल्या. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनीही या शिबिराला भेट देऊन नागरिकांसोबत स्वतःची कोरोना चाचणी केली.

    पिंपरी पोलीस चौकी येथे पिंपरी कॅम्प परिसरातील नागरिक, भाजी मंडई मधील विक्रेते, हमाल आणि कामगार यांच्यासाठी रॅपिड अँटिजेन टेस्ट कॅम्प आयोजित करण्यात आला. या कॅम्पला पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी भेट दिली. संचारबंदीच्या काळात सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत भाजीपाला, किराणा मालाची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी आहे. पिंपरी पोलीस चौकीच्या शेजारी पिंपरी मधील मुख्य भाजी मंडई आहे.

    पोलीस आयुक्तांनी मंडईमध्ये फेरफटका मारून विक्रेत्यांशी संवाद साधला. कोरोना साथीचा प्रदूर्भाव कमी करण्यासाठी खबरदारी घेण्याचे तसेच शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिास आयुक्तांनी केले. पिंपरीमधील रॅपिड अँटिजेन शिबिरात सर्वसामान्य नागरिक, भाजी विक्रेते आणि हमाल यांच्यासोबत आयुक्तांनी देखील स्वतःची कोरोना अँटिजेन टेस्ट केली. या टेस्टमध्ये आयुक्तांचा अहवाल निगेटिव्ह आला.