Arrest

प्रल्हाद भंडारी हा टोळी प्रमुख आहे. तर, शहारूख मनसुरी याचा लोणी काळभोर परिसरात ताडी दारूचा व्यवसाय होता. सुनिल बनसोडे हा काम करत होता. दरम्यान, अमली पदार्थ विरोधी पथक दोनने याठिकाणी छापा कारवाई केली होती. त्यावेळी या दोघांना पकडले होते. या गुन्ह्याचा तपास करण्यात आला. त्यात प्रल्हाद व निलेश हे दोघे त्यांना ताडीसाठी लागणारे रसायन पुरवत असल्याची माहिती मिळाली.

    पुणे : अवैधरित्या दारू बनवून (हातबट्टी) त्याची विक्री करणाऱ्या चौघांच्या टोळीवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कारवाई केली आहे. राज्यात पहिल्यांदाच हातबट्टी दारू बनविणे व त्याची विक्री करणाऱ्यांवर मोक्का कारवाई झाली आहे. पोलीस आयुक्तांची ही ५१ वी कारवाई ठरली आहे. या कारवाईने अवैध धंदेवाल्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. राज्य दारूबंदी विभागाने अनेकवेळा या अड्यावर कारवाई केली होती. पण, ही टोळी दारू बनवून विक्री करत असायचे.

    सुनिल गंगाराम बनसोडे (वय २०, रा. सोरतापवाडी, ता. हवेली), शहारूख युसुफ मनसुरी (वय २५, रा. लोणी काळभोर), प्रल्हाद उर्फ परंश रंगनाथ भंडारी (रा. केशवनगर, मुंढवा) व निलेश विलास बांगर (रा. पुणे) अशी कारवाई केलेल्या टोळीचे नाव आहे. यात निलेश बांगर पसार झाला असून, त्याचा शोध घेतला जात आहे. तर, सुनिल बनसोडे व शहारूख मनसुरी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर, प्रल्हाद भंडारी हा पोलीसांच्या कस्टडीत आहे.

    प्रल्हाद भंडारी हा टोळी प्रमुख आहे. तर, शहारूख मनसुरी याचा लोणी काळभोर परिसरात ताडी दारूचा व्यवसाय होता. सुनिल बनसोडे हा काम करत होता. दरम्यान, अमली पदार्थ विरोधी पथक दोनने याठिकाणी छापा कारवाई केली होती. त्यावेळी या दोघांना पकडले होते. या गुन्ह्याचा तपास करण्यात आला. त्यात प्रल्हाद व निलेश हे दोघे त्यांना ताडीसाठी लागणारे रसायन पुरवत असल्याची माहिती मिळाली. पोलीसांनी प्रल्हाद याला पकडले. तपासात ते रसायन पुरवत असल्याचे दिसून आले. दरम्यान तिघांना पकडल्याची माहिती कळताच निलेश हा पसार झाला. या गुन्ह्याचा तपास करत असातना पोलीसांना आरोपी हे कारवाई करून देखील सतत ताडी बनवून त्याची विक्री करत असल्याचे दिसून आले.

    त्यानुसार, पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड व त्यांच्या पथकाने आरोपींवर मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्याकडे पाठविला. त्यांनी प्रस्तावाची छाननी केली. तो प्रस्ताव कारवाईसाठी पोलीस आयुक्तांकडे पाठविला. त्यानुसार पोलीस आयुक्तांनी त्यावरत मोक्काच्या कारवाईचा आदेश दिला आहे. पोलीस आयुक्तांची ही ५१ वी मोक्का कारवाई आहे.

    राज्य दारूबंदी विभाग २०१५ पासून या अड्यावर कारवाई करत होते. तरीही आरोपी त्याठिकाणी ताडी बनवून त्याची विक्री करत होते. त्यांच्यावर २०१५ पासून गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर कारवाईकरन देखील ते अवैधरित्या हातबट्टी तयार करत असत. तसेच, त्याची विक्री करत होते. दरम्यान, ताडी विक्री प्रकरणात राज्यातील मोक्का कारवाईची ही पहिली कारवाई आहे.