know about these 6 fake websites do not click on this link alert by PIB

गुरुवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास नाकाबंदीच्या ठिकाणी हजर राहण्यासाठी फिर्यादी गराडे यांनी आरोपी पोवार याला फोनवर सांगितले. त्यावरून 'तू माझा बाप आहेस का ? तू मला कोण सांगणारा ?' असे उद्धटपणे बोलून पोवार लोखंडी गज घेऊन आला. त्याने गराडे यांना गजाने तसेच लाथांनी मारले. यात पोलीस हवालदार गराडे जखमी झाले. पोवार याने संवेदनशील बंदोबस्ताच्या नियोजनात हलगर्जीपणा केला. तसेच शासकीय कामात व्यत्यय आणण्याचे काम केले असल्याचा ठपका ठेवत पोवार याला निलंबित करण्यात आले आहे.

    पिंपरी : नाकाबंदीच्या ठिकाणी हजर होण्यास सांगितल्याने एका पोलीस शिपायाने पोलीस हवालदाराला उद्धटपणे बोलून लोखंडी गजाने मारहाण केली. या बेजबाबदार वागणुकीमुळे मारहाण करणाऱ्या पोलीस शिपायाला निलंबित करण्यात आले आहे.

    सुरज जालिंदर पोवार असे निलंबित पोलीस शिपायाचे नाव आहे. किसन विठोबा गराडे (वय ५२) असे मारहाण झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. या प्रकरणी त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना गुरुवारी (दि. २२) रात्री साडेदहा वाजता हॅरिस ब्रीज दापोडी येथे घडली होती.

    कोरोना साथीच्या पाश्र्वभूमीवर पिंपरी – चिंचवड पोलिसांकडून शहरात येणाऱ्या – जाणाऱ्या मार्गांवर नाकाबंदी लावण्यात आली आहे. हॅरिस ब्रीजवरही नाकाबंदी लावण्यात आली होती. पोलीस हवालदार गराडे हे वाकड पोलीस ठाण्यात तर पोलीस शिपाई पोवार हा भोसरी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. फिर्यादी पोलीस हवालदार गराडे आणि आरोपी पोलीस शिपाई पोवार यांची ड्युटी गुरुवारी (दि. २२) या नाकाबंदी पॉर्इंटवर लावण्यात आली होती. गुरुवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास नाकाबंदीच्या ठिकाणी हजर राहण्यासाठी फिर्यादी गराडे यांनी आरोपी पोवार याला फोनवर सांगितले. त्यावरून ‘तू माझा बाप आहेस का ? तू मला कोण सांगणारा ?’ असे उद्धटपणे बोलून पोवार लोखंडी गज घेऊन आला. त्याने गराडे यांना गजाने तसेच लाथांनी मारले. यात पोलीस हवालदार गराडे जखमी झाले. पोवार याने संवेदनशील बंदोबस्ताच्या नियोजनात हलगर्जीपणा केला. तसेच शासकीय कामात व्यत्यय आणण्याचे काम केले असल्याचा ठपका ठेवत पोवार याला निलंबित करण्यात आले आहे.