sharad pawar

उजनी धरणातून इंदापूर तालुक्‍याला 5 टीएमसी पाणी देण्यासंदर्भातील आदेश रद्द केल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर येऊन तोंडी आश्वासन दिले. मात्र, अजूनही सरकारचा लेखी आदेश मिळाला नाही. उजनीचा पाणी प्रश्न पेटल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. जयंत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे सोलापुरात दहन करण्यात आले. यानंतर बारामतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग निवास्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. उजनी पाणीप्रश्नी शेतकऱ्यांनी आंदोलनंचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान बारामतीमध्ये २ शेतकरी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    बारामती : उजनी धरणातून इंदापूर तालुक्‍याला 5 टीएमसी पाणी देण्यासंदर्भातील आदेश रद्द केल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर येऊन तोंडी आश्वासन दिले. मात्र, अजूनही सरकारचा लेखी आदेश मिळाला नाही. उजनीचा पाणी प्रश्न पेटल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. जयंत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे सोलापुरात दहन करण्यात आले. यानंतर बारामतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग निवास्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. उजनी पाणीप्रश्नी शेतकऱ्यांनी आंदोलनंचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान बारामतीमध्ये २ शेतकरी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    सध्या पोलिस या विषयावर अधिक सतर्क झाले असून शेतकऱ्यांची धरपकड करण्यास सुरुवात केली आहे. सोलापूर आणि इंदापूरच्या शेतकऱ्यांनी उजनी पाणी प्रश्नी आंदोलन सुरु केल आहे. बारामतीत शेतकरी शरद पवारांच्या निवास्थानी आंदोलन करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशयातून इंदापूर तालुक्यातील 22 गावांना पाच टीएमसी पिण्याचे पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

    मात्र, सर्व स्तरातून विरोध झाल्यानंतर तो निर्णय पाटील यांनी रद्द करत असल्याचे सांगितले. मात्र जयंत पाटलांनी तोंडी आश्वासन न देता आंदोलनस्थळी लेखी आश्वासन द्यावे आणि शासन दरबारी तसा अध्यादेश काढावा, या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी मंत्री जयंत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.