महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ;  सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांचे आदेश

महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसह घटक पक्ष व संघटना सहभागी होत आहेत. त्याची जय्यत तयारी झाली आहे. भारतीय जनता पक्षाचा या बंदला विरोध आहे. जिल्हाधिकारी कार्यालयापासून मोर्चा निघणार आहे. त्यामुळे शहरात पोलीसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुर्ण खबरदारी घेण्यात आली आहे.

    पुणे : महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुणे पोलीसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांच्या अंगावर कार घालून चिरडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र विकास आघाडीने आज बंद पुकारला आहे.

    महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसह घटक पक्ष व संघटना सहभागी होत आहेत. त्याची जय्यत तयारी झाली आहे. भारतीय जनता पक्षाचा या बंदला विरोध आहे. जिल्हाधिकारी कार्यालयापासून मोर्चा निघणार आहे. त्यामुळे शहरात पोलीसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी आदेश दिले आहेत. पोलीसांकडून पुर्ण तयारी झाली आहे. संघटना, पक्ष यांच्याशी पोलीस समन्वय ठेवून आहेत. बंददरम्यान कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतली जात असून, सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी आयोजक संघटनांनी घ्यावी, असे आवाहन सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे.

    असा आहे बंदोबस्त

    दोन अतिरिक्त पोलीस आयुक्त, दोन पोलीस उपायुक्त, आठ सहाय्यक पोलीस आयुक्त, १३ पोलीस निरीक्षक, ७६ सहाय्यक निरीक्षक व ८७ पोलीस उपनिरीक्षक तसेच तीन हजार पोलीस कर्मचारी व अधिकारी तैनात असणार आहेत.